जगातील असे काही देश जिथे महिलांची संख्या पुरूषांपेक्षाही जास्त, वाचा रिपोर्ट

Female Population: गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर लोकसंख्येतील महिलांचा वाटा वाढताना दिसत आहे. जगात असे काही देश आहेत जिथे लोकसंख्येतील महिलांचा वाटा जास्त आहे. अशा देशांची माहिती जाणून घेऊयात.

जगातील असे काही देश जिथे महिलांची संख्या पुरूषांपेक्षाही जास्त, वाचा रिपोर्ट
Male Female Sex Ratio
| Updated on: Nov 16, 2025 | 6:21 PM

भारतात महिलांची संख्या पुरूषांच्या तुलनेत कमी आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर लोकसंख्येतील महिलांचा वाटा वाढताना दिसत आहे. कारण असे काही देश आहेत जिथे महिलांची संख्या पुरूषांपेक्षा जास्त आहे. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाच्या आणि जागतिक बँकेने याबाबतची माहिती दिली आहे.

या देशांमध्ये महिलांची संख्या जास्त

अनेक ठिकाणी पुरूष कामानिमित्त स्थलांतर करतात, त्यामुळे खेडे गावांमधील पुरूषांची संख्या कमी झाली असून पुरूषांची संख्या वाढली आहे. युरोपमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. लाटविया, लिथुआनिया आणि युक्रेन या देशांमध्ये 100 पुरुषांमागे 116 ते 118 महिला आहेत. हे देश सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले देश आहेत. पुरुषांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि वृद्ध लोकसंख्येत महिलांचा जास्त वाटा ही यामागील प्रमुश कारणे आहेत.

रशिया आणि बेलारूस या देशांमध्येही लोकसंख्येची परिस्थीती अशीच आहे. पोर्तुगाल, फ्रान्स आणि जर्मनी सारख्या पश्चिम युरोपीय देशांमध्येही महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. हा आकडा 100 ते 105 च्या दरम्यान आहे. इतर काही देशांमध्येही महिला आणि पुरूषांची संख्या जवळपास समान आहे.

नेपाळ आणि हाँगकाँगमध्येही महिलांची संख्या जास्त

नेपाळमधील पुरुष रोजगारासाठी परदेशात स्थलांतर करत असतात, त्यामुळे या देशातील महिलांची संख्या जास्त आहे. हाँगकाँगमध्येही महिलांचे आयुर्मान जास्त असल्याने आणि पुरुषांचे आयुर्मान कमी असल्याने या ठिकाणीही पुरूषांची संख्या महिलांच्या तुलनेत जास्त आहे.

आफ्रिकेतील लिंग गुणोत्तराचे प्रमाण काय आहे?

लेसोथो आणि नामिबिया या देशांमधील पुरूष दक्षिण आफ्रिकेतील खाणींमध्ये काम करण्यासाठी स्थलांतर करतात, यामुळे या देशांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर अर्जेंटिना आणि उरुग्वे या दक्षिण अमेरिकन देशांमध्ये वृद्ध महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या देशांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे.

दरम्यान, संपूर्ण जगातील सरासरी काढल्यास पुरुष आणि महिलांची संख्या जवळपास समान आहे. 100 महिलांमागे 101 पुरुष आहेत. मात्र पुरूषांची संख्या कमी होत असल्याने महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. महिला आणि पुरूषांच्या लोकसंख्येत असणारी ही तफावत समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे.