3 सप्टेंबरला होणार मोठा धमका, ट्रम्प यांचे 3 सर्वात मोठे शत्रू अन् चीन…, जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं ते आता घडणार

एक मोठी बातमी समोर येत आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर आता नवं समिकरण तयार होणार असून, यामुळे अमिरिकेचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

3 सप्टेंबरला होणार मोठा धमका, ट्रम्प यांचे 3 सर्वात मोठे शत्रू अन् चीन..., जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं ते आता घडणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 8:45 PM

3 सप्टेंबर रोजी चीन संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवणार आहे, विजय दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये चीनी सैनिक बिजिंगच्या रस्त्यांवर जगाला आपली शक्ती दाखवणार आहेत. या भव्य कार्यक्रमामध्ये 26 देशांचे राष्ट्रपती आणि नेते सहभागी होणार आहेत. मात्र जरी असं असलं तरी या परेडमध्ये अमेरिका आणि पाश्चिमात्य देशाचा एकही नेता सहभागी होणार नाहीये, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन सर्वात मोठे शत्रू असलेले तीन नेते या कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. इराणचे राष्ट्रपती पेझेश्कियान, उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे तीनही नेते या कार्यक्रमाला चीनमध्ये उपस्थित राहणार आहेत.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार पुढील आठवड्यात चीनमध्ये विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विविध देशांचे 26 प्रमुख आणि सरकारचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. युरोपीय संघाचा सदस्य असलेला देश स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको वगळता युरोपीय संघात असलेला इतर कोणताही देश या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाहीये, यावरूनच चीनच्या महत्वाकांक्षेचा अंदाज येतो, चीन सध्या अमेरिकेला आव्हान देण्याची तयारी करत आहे.

इराण, रशिया आणि उत्तर कोरियाचे प्रमुख हे बिजिंगमध्ये होणाऱ्या या सैन्य परेडमध्ये सहभागी होणार आहेत. ते इथे एक प्रकारे पाश्चिमात्य देशांचा दबाव झुगारून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ही पहिलीच वेळ असणार आहे, ज्यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत हे तीन मोठे नेते एकत्र येणार आहेत. 3 सप्टेंबरला चीन जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया हे तीन देश अमेरिकेचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जातात, यांना एकत्र आणून चीन या माध्यमातून अमेरिकेला एक स्पष्ट संदेश देण्याच्या तयारीमध्ये आहे. या व्यासपीठावरून चीन, रशिया, उत्तर कोरिया आणि इराण आपल्या एकजुटतेचं प्रदर्शन करणार आहे.

या कार्यक्रमाला रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन, उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन, कंबोडियाचे राजा नोरोदम सिहामोनी, व्हिएतनामचे राष्ट्रपती लुओंग कुओंग, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, यांच्यासह अन्य देशातील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.