इराणवर भयानक संकट, थेट 12 देशांनी एकत्र येत…युद्धाचा सर्वात भयानक दरवाजा उघडला!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस पेटत चालले आहे. या युद्धामुळे आखाती देशदेखील होरपळत आहेत. इराणने आखाती देशांवर हल्ले केल्यानंतर आता आखाती देश एकत्र आले आहेत. त्यामुळे जगाचे टेन्शन जास्तच वाढले आहे.

इराणवर भयानक संकट, थेट 12 देशांनी एकत्र येत...युद्धाचा सर्वात भयानक दरवाजा उघडला!
iran israel war
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2026 | 3:30 PM

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध चांगलेच भडकत आहे. इस्रायल आणि अमरिकेकडून इराणच्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ठार केले जात आहे. त्यामुळेच इराणकडूनही अमेरिकेला पाठिंबा देणारे तसेच अमिरेकिचे लष्करी तळ असणाऱ्या देशांवर हल्ले करत आहे. गुरुवारी (19 मार्च) इराणने सौदी अरेबिया, कतार, यूएई या देशांमधील महत्त्वाच्या गॅस तसेच तेलाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. इराणच्या या हल्ल्यांमुळे आखाती देशांचे मोठे नुकसान झाले आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता तब्बल 12 देश एकत्र आले आहेत. या सर्व देशांनी एकत्र येऊन इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच इराणने हे हल्ले लवकरात लवकर रोखावेत अन्यथा आम्हीदेखील कठोर कारवाई करू, असा इशाराही या देशांनी दिला आहे.

12 देशांनी नेमका काय इशारा दिला?

मिळालेल्या माहितीनुसार 12 मुस्लीम देशांची ही बैठक सौदी अरेबियातील रियाध या शहरात झाली आहे. या बैठकीनंतर या सर्व राष्ट्रांनी इराणने हल्ले थांबवावेत असा इशारा दिला आहे. तसेच इराणने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करू नये, असाही सल्ला दिला आहे. इराण जर रहिवाशी परिसरात, पायाभूत सविधांवर तेल निर्मिती केंद्रांवर, विमानतळे, राजनैतिक संकुलांनाल क्ष्य करत असेल तर हे हल्लेदेखील लवकरात लवकर थांबवावेत, असेही आवाहन या 12 देशांनी केले आहे.

इस्रायलकडून इराणवरही केले जातायत हल्ले

इराण आखाती देशांवर हल्ले करत असला तरी दुसरीकडे इस्रायलदेखील इराणवर हल्ले करत आहे. बुधवारी इस्त्रायलने इराणच्या समुद्रकिनारी असलेल्या नैसर्गिक वायू निर्मिती प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे इराणने संताप व्यक्त केला. याच हल्ल्यानंतर इराणने आखाती देशांवर हल्ले केले. इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील हबशान गॅस प्रकल्पावर आणि बाब क्षेत्राला लक्ष्य केलं. त्यानंतर हा हल्ला म्हणजे आम्हाला युद्धासाठी उद्युक्त करण्याचाच प्रकार आहे, असा संताप संयुक्त अरब अमिरातीने व्यक्त केला. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? आखाती आणि मुस्लीम राष्ट्र एकत्र येऊन इराणविरोधात कठोर पावलं उचलणार का? असे विचारले जात आहे.

Follow Us