आकाशातून कोसळणार मृत्यूचा पाऊस, इराणमधील पावसाचा एक थेंबही…Video पाहून थरकाप उडेल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इराणमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. पण या पावसाचा एक थेंबही अंगावर पडला तर भयानक स्थिती निर्माण होऊ शकते.

आकाशातून कोसळणार मृत्यूचा पाऊस, इराणमधील पावसाचा एक थेंबही...Video पाहून थरकाप उडेल
Iran acidic rain
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 09, 2026 | 5:07 PM

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या भीषण संघर्षात इराण एकटाच अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांना तोंड देत आहे. एकीकडे इस्रायल-अमेरिकेच्या बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणच्या ऊर्जा आणि लष्करी सुविधांना मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणीय संकटाने तेहरान शहराला घेरले आहे. राजधानी तेहरानमध्ये आता युद्धाच्या आगीपेक्षा अधिक भयानक दृश्य दिसत आहे. विषारी काळा पाऊस (Toxic Black Rain) पडत आहे, ज्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे धोकादायक ठरले आहे.

तेल केंद्रांवर हल्ल्याचा भीषण परिणाम

शनिवारी रात्री (७-८ मार्च २०२६) इस्रायल आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी तेहरान आणि परिसरातील प्रमुख तेल साठवणूक केंद्रांवर (Fuel Depots) प्रचंड हल्ले केले. यात शहरान (Shahran) ऑइल डेपो, अघदासिया (Aghdasieh) फ्यूल वेअरहाऊस, तेहरान रिफायनरी (दक्षिण भाग), कराज आणि अल्बोर्ज प्रांतातील तेल सुविधांचा समावेश आहे. या हल्ल्यांमुळे प्रचंड आग लागली, लाखो गॅलन तेल जळले आणि आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. रविवारी सकाळी पाऊस सुरू झाला तेव्हा तो सामान्य पांढरा नव्हता – तो काळा, तेलाने मिसळलेला आणि उग्र वास असलेला होता. हे दृश्य अपोकॅलिप्टिक (Armageddon सारखे) वर्णन केले जात आहे.

‘टॉक्सिक रेन’चे धोके

इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने (Iranian Red Crescent) आपत्कालीन इशारा जारी केला आहे. हा पाऊस हायड्रोकार्बन्स, सल्फर ऑक्साइड्स, नायट्रोजन ऑक्साइड्स यांचे विषारी मिश्रण (Toxic Cocktail) आहे. यामुळे:

-त्वचेवर पडल्यास रासायनिक जळजळ, कायमस्वरूपी जखमा किंवा केमिकल बर्न्स होऊ शकतात.

-श्वास घेतल्यास फुप्फुसांना गंभीर इजा, श्वास बंद पडणे किंवा दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

-हे अॅसिड रेन सारखे असून, वातावरणातील प्रदूषण वाढवत आहे.

प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, एसी/वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्याचे, पावसात भिजू न देण्याचे आणि घरातच राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. अनेक रहिवाशांनी डोळे जळणे, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यात त्रास येत असल्याचे सांगितले आहे.

इराणचा प्रतिहल्ला: आखाती देशांना लक्ष्य

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कोर्प्स (IRGC) ने प्रत्युत्तरादाखल आखाती देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

यामध्ये-

– कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाक्यांवर हल्ला – विमान वाहतूक विस्कळीत, आग नियंत्रणात आणली.

– बहरीनमधील वॉटर डिसॅलिनेशन प्लांट (पाणी शुद्धीकरण प्रकल्प) ला नुकसान – तीन जण जखमी, पहिल्यांदाच असा नागरी पाणीपुरवठा ठिकाण लक्ष्य.

-इस्रायलमधील तेल सुविधांवरही हल्ले.

इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या संसाधनांचा (विशेषतः पाणी आणि तेल) नाश केला गेला तर संपूर्ण आखाती प्रदेशातील पाणीपुरवठा धोक्यात येईल. यामुळे आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे युद्ध आता फक्त लष्करी नाही तर पर्यावरण आणि नागरी जीवनावरही गंभीर परिणाम टाकत आहे. संपूर्ण मध्य पूर्वात अस्थिरता वाढली असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी होत आहे.

Follow Us