
Trump Tariffs Impact : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत व्यापारयुद्ध आणि मंदी तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भीतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (3 एप्रिल) अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. ही बातमी लिहिली जाईपर्यंत अमेरिकेत नॅसडॅक 4.78 टक्क्यांनी घसरला होता. एस अँड पी 500 मध्येही 3.97 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय डाऊ जोन्स मध्ये 3.47 टक्क्यांची मोठी घसरण झाली.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. नायकीचा शेअर 11 टक्के आणि अॅपलचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला. नायकीची निर्मिती व्हिएतनाममध्ये होते. आयात मालाच्या मोठ्या विक्रेत्यांना सर्वाधिक फटका बसला. फाईव्ह बिलमध्ये 25 टक्के, डॉलर ट्री 9 टक्के आणि गॅपच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घसरले. सेमीकंडक्टर चिप उत्पादक कंपनी एनव्हिडिया 5 टक्क्यांनी तर इलेक्ट्रिक वाहन निर्माता एलन मस्क यांची कंपनी टेस्ला 3.5 टक्क्यांनी घसरली.
परिणाम जगभरातील बाजारपेठांवर दिसून येत आहे. चीनच्या शेअर बाजारात घसरण झाली. हँगसेंग 1.54 टक्के आणि शांघाय कम्पोझिट 0.24 टक्क्यांनी घसरला. याशिवाय भारतासह आशियातील उर्वरित महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
3 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी मात्र खालच्या स्तरावरून बंद झाले. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 322.08 अंकांनी घसरून 76,295.36 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 82.25 अंकांनी म्हणजेच 0.35 टक्क्यांनी घसरून 23,250.10 च्या पातळीवर बंद झाला.
निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. निफ्टी बँक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरत आहेत. मिड आणि स्मॉल कॅप शेअर्सवर पुन्हा एकदा विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
बाजारातील घसरणीचा अंदाज यावरून लावता येतो की, निफ्टी 50 चे 43 समभाग विक्रीवर वर्चस्व गाजवत आहेत, केवळ 3 समभाग तेजीसह व्यवहार करीत आहेत. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या समभागांचा समावेश आहे. याशिवाय निफ्टी आयटी, ऑटो, पीएसयू बँक, एफएमसीजी, मेटल आणि रियल्टी सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टी मेटलमध्ये सर्वाधिक 4 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
या जोखमीच्या काळात तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून बँका, एफएमसीजी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांशी संबंधित शेअर्स दीर्घ मुदतीसाठी खरेदी करता येतील. परंतु, गुंतवणूकदारांना मूल्यांकनाबाबत थोडी सावधगिरीने गुंतवणूक करावी लागेल.
दुसरीकडे अमेरिकेने फार्मा कंपन्यांना टॅरिफपासून दूर ठेवले होते, पण आता ते फार्मा सेक्टरवरही टॅरिफ लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर फार्मा निर्देशांक 5 टक्क्यांहून अधिक घसरला आहे, तर फार्मा शेअर्स गुरुवारी 10 टक्क्यांपर्यंत वधारले.