
गेल्या काही महिन्यापासून अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. काही देशांमध्ये युद्धही झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र आता आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील देश तुर्की युद्धाच्या मैदानात उरतण्याची शक्यता आहे. तुर्कीने काही दिवसांपूर्वूी घोषणा केली होती की, जर सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने माघार घेतली नाही तर कठोर परिणामांना सामोरे जावे लागले. मात्र सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने याकडे फारसे लक्ष दिले नाही, त्यामुळे आता तुर्की सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सवर हल्ला करण्याची शक्यता आहे.
तुर्कीने दिलेला इशारा सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने गंभीरतेने घेतला नाही. सध्या दमास्कसपासून अंकारापर्यंत लष्करी हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आता तुर्की सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तुर्कीने बऱ्याच काळापासून कोणतेही युद्ध लढलेले नाही, मात्र या देशाने पाकिस्तानसारख्या देशांना शस्त्रे पुरवण्याचे काम केलेले आहे.
तुर्की युद्धात का उतरणार?
सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सच्या तुलनेत सीरियाचे सैन्य कमजोर आहे. सीरिया डेमोक्रॅटिक फोर्सकडे सध्या 1 लाख सैनिक आहेत. मात्र सीरियाच्या सैन्यात कमी सैनिक आहेत. अल शार सीरियाचे अध्यक्ष बनले आहेत, मात्र त्यांना अद्याप सैन्य आणि स्थिर सरकार स्थापन करता आलेले नाही. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुर्की सैन्य अल शाराचे संरक्षण करत आहे. सीरियामध्ये अल शारा यांना मारण्याचे 3 प्रयत्न झाले होते, मात्र त्यांचा जीव तुर्की सैन्यामुळे वाचला होता.
सीरियाचे सैन्य आणि सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसमध्ये संघर्ष झाला तर सीरियन सैन्य कमजोर पडेल. कारण ड्रुझ आणि अलावाइट समुदायांनी आधीच अल शाराविरुद्ध बंड पुकारले आहे, त्यामुळे तुर्कीचे सैन्य सीरियन सैन्याच्या मदतीसाठी जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे तुर्कीने एसडीएफला थेट इशारा दिला होता की, कारवाया थांबवल्या नाही तर तुम्हाला धडा शिकवला जाईल.
तुर्कीने युद्धात उतरण्याचे आणखी एक कारण म्हणजे सीरियातील ज्या भागात एसडीएफ सक्रिय आहे तो भाग तुर्कीच्या सीमेला लागून आहेत. त्यामुळे भविष्यात याचे परिणाम तुर्कीलाही भोगावे लागू शकतात. त्यामुळे तुर्की संकट येण्याआधीच सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सवर हल्ला करण्याची शक्यता आहे. कारण याआधीही अनेकदा तुर्कीने एसडीएफला माघार घेण्याची विनंती केली होती, मात्र त्यावेळीही एसडीएफने माघार घेतली नव्हती.