US Attack On Iran : पाकिस्तान नाही, आणखी एका मुस्लिम देशाची इराणसोबत गद्दारी, बॉम्ब पडणार माहित असूनही अमेरिकेसोबत निष्ठा
US Attack On Iran : इराण मुस्लिम बहुल देश असल्यामुळे जगातील अनेक मुस्लिम देश आज इराणसोबत निष्ठा दाखवत आहेत. पण असेही काही मुस्लिम देश आहेत, ज्यांनी इराणसोबत गद्दारी केली. त्यात एक असा देश आहे, ज्यांना इराणवर अमेरिका हल्ला करणार हे माहित होतं. पण त्यांनी अमेरिकसोबत आपली निष्ठा जपली. हा देश पाकिस्तान नाहीय.

इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अनेक मुस्लिम देश आज इराणबद्दल सहानुभूती व्यक्त करताना अमेरिकेवर टीका करत आहेत. पण इराणसोबत काही मुस्लिम देशांनी गद्दारी केली. जॉर्डन तर सुरुवातीपासूनच इराणच्या विरोधात आहे. पाकिस्तानचे जिहादी विचारांचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी युद्धकाळात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लंच केला. पाकिस्तान एकाबाजूला इराणच्या बाजूने बोलतोय. दुसरीकडे ते ट्रम्पसोबत लंच करतात. तुर्की सुद्धा एक असा देश आहे, जो इस्लाम, मुस्लिम धर्माच्या आधारावर इराणच्या बाजूने बोलत होता. पण या तुर्कीनेच इराणसोबत गद्दारी केली. इराणवर B 2 बॉम्बर या शक्तीशाली विमानातून GBU 57 हा बॉम्ब पडणार हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांना माहित होतं.
Axios ने व्हाइट हाऊसच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, “इराणच्या न्यूक्लियर साइटवर बॉम्ब टाकण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनवेळा एर्दोगान यांच्याशी फोनवर चर्चा केली होती” इराण आणि अमेरिकेने तुर्कीमध्ये डीलवर चर्चा करावी, अशी एर्दोगान यांची इच्छा होती. यावर ट्रम्प म्हणाले की, ‘इराण राजी असेल, तर इंस्ताबुलमध्ये तुम्ही बैठक बोलवा’ ट्रम्प या बैठकीसाठी अमेरिकेकडून उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि मध्य पूर्वचे विशेष राजदूत विटकॉफ यांना पाठवणार होते. फायनल डीलसाठी इराणचे राष्ट्रपती आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना इस्तांबुलला बोलवा. ट्रम्पचा हा संदेश जसा इराणपर्यंत पोहोचला, इराणचे सुप्रीम लीडर भडकले.
खामेनेई तयार नव्हते
इराणच्या सुप्रीम लीडरने तुर्कीचा प्रस्ताव फेटाळून लावला. अमेरिकेच्या अटीवर चर्चा होणार नाही असं खामेनेईच मत होतं. एक्सियोसने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. सुप्रीम लीडर खामेनेई तेहरानजवळ एका बंकरमध्ये लपले आहेत, हा संदेश तुर्कीच्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यात आला तसं एर्दोगानने दुसऱ्यांदा ट्रम्पना फोन केला. ट्रम्प यांनी यानंतर बी-2 बॉम्बरने हल्ला करण्याचा आदेश दिला.
मिडल इस्टमध्ये अमेरिकेचे किती हजार सैनिक?
सगळ्या जगाच लक्ष आता इराण काय पलटवार करतो, त्याकडे आहे. इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईने कठोर शिक्षा मिळणार असं म्हटलं आहे. मीडल इस्टमधील अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांवर इराण हल्ला करु शकतो, मिडल इस्टमध्ये अमेरिकेचे 50 हजार सैनिक तैनात आहेत.
