तुर्कीचा माज उतरेना, थेट काश्मीरबद्दल धक्कादायक विधान, मोठी मागणी, भारताला..
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात भूमिका घेतली. त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर मोठे विधान केले. भारताने 100 वेळा सांगितले की, काश्मीरच्या मुद्द्यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाहीच, तेच तुर्कीने केले.

तुर्कीचा माजुरेपणा थांबण्याचे नाव घेत नाही. सतत तुर्कीकडून भारताविरोधात भूमिका घेतली जात आहे. आता तर भारताने ज्याचा विचारही केला नाही, असे धक्कादायक काम संयुक्त राष्ट्रांच्या सभेत तुर्कीने घेतले. तुर्कीच्या मनात भारताविरोधात किती जास्त काळे आहे, हे यानिमित्ताने पुढे आले. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेच्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा भारताच्या विरोधात द्वेषपूर्ण पाऊल उचलले. यामुळे भारताला फार काही धक्का नक्कीच बसला नाही, कारण गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात सातत्याने भूमिका तुर्की घेत आहे. पाकिस्तानच्या नादी लागून स्वत:च्या पायावर दगड मारताना तुर्की दिसत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. काश्मीरच्या मुद्द्यात तिसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही, असे स्पष्ट शब्दात भारताने सांगितले. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने त्यात उडी घेतली.
एर्दोगन यांनी आमसभेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी असे प्रतिपादन केले की, दक्षिण आशियातील सर्व वाद ज्यामध्ये काश्मीरच्या मुद्द्याचाही समावेश आहे. हे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या चौकटीत राहून संवादाद्वारे सोडवले जावेत. तुर्कीची ही भूमिका अत्यंत मुर्खपणाची आहे. कारण हा मुद्दा शेवटी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे. त्यात इतर कोणाचा हस्तक्षेप असू नये.
अमेरिका देखील या मुद्द्यापासून दूर राहत आहे. पाकिस्तानने यात हस्तक्षेप करण्याची विनंती अमेरिकेला केली. मात्र, भारताच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने स्पष्ट केले की, आम्ही यात पडणार नाही. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे मंगळवारी अर्थात 23 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत भाषण करताना तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान म्हणाले की, काश्मीरचा प्रश्न आणि दक्षिण आशियातील इतर सर्व वाद हे संयुक्त राष्ट्र सनद व संबंधित ठरावांच्या चौकटीत राहून संवाद व चर्चेद्वारे सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गेल्या वर्षीच्याही संयुक्त राष्ट्राच्या महासभेत तुर्कीकडून हाच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळीही त्यांच्याकडून तेच करण्यात आले. काश्मीरवरील आपल्या सार्वभौमत्वाबाबत भारताने आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली आहे. भारताकडून आता तुर्कीच्या या विधानानंतर जोरदार टीक केली जाणार हे स्पष्टच आहे. तुर्कीने पुन्हा एकदा भारतासोबत पंगा घेतला.