टाइट कपडे घातले, थेट गव्हर्नरची हकालपट्टी, जेनझी संतापले; रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन

तुर्कीमधील अर्दाहान प्रांताचे गव्हर्नर सिसेकलीयांना सायकल चालवताना घट्ट स्पोर्ट्सवेअर घातल्यामुळे त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. तुर्की सरकारच्या या निर्णयानंतर, मोठ्या संख्येने लोकांनी त्यांच्या समर्थनात आवाज उठवला आहे.

टाइट कपडे घातले, थेट गव्हर्नरची हकालपट्टी, जेनझी संतापले; रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन
तुर्कीमध्ये कपड्यांमुळे राज्यपालांनी गमावलं पद
Image Credit source: Fatih Cicekli instagram
| Updated on: Jul 24, 2026 | 10:59 AM

नीट पेपरफुटीवरून देशात सध्या आंदोलन पेटल आहे. जेन झी चा सहभाग असलेल्या या आंदोलनाला अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्य जतनेने मोठा पाठिंबा दप्शवला असून दिवसेंदिवस या आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली आहे. तर दुसरीकडे एका देशात शुल्लक कारणावरून गव्हर्नरची हकालपट्ची केल्यामुळे जन झी संतापली असून थेट रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करण्यात येत आहे. तुर्कीमध्ये एका गव्हर्नच्या पोशाखावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्दहान प्रांताचे राज्यपाल मेहमत फतिह सिसेकली यांनी सायकलिंग करताना घातलेल्या कपड्यावरून टीका झाली, त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. सरकारने मात्र त्यांच्या हटवण्यामागचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र यामुळे वातावरण तापलं असून पोशाख नव्हे त्यांचं काम पहा असं म्हणत समर्थाकांनी या हकालपट्टीचा निषेध केला.

काय आहे प्रकरण ?

तुर्कीतील अर्दहान प्रांताचे राज्यपाल मेहमत फतिह सिसेकली हे सायकलिंग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर आणि वृत्तमाध्यमांमध्ये चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये त्यांनी सायकलिंगसाठी वापरले जाणारे घट्ट स्पोर्ट्सवेअर घातल्याचं दिसून आलं. मात्र त्यांच्या या पोशाखावर सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला. आणि सिसेकली यांची पदावरून हकालपट्टी झाली. सरकारने मात्र त्यांच्या हटवण्यामागचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

संसदेतही गाजला पोशाखाचा मुद्दा

तुर्कीच्या संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाचे खासदार इनान अक्गुन अल्प यांनी T-24 या वृत्तसंस्थेच्या अहवालाचा संदर्भ देत सिसेकली यांच्या पोशाखावर प्रश्न उपस्थित केले. “राज्यपाल हे सार्वजनिक पदावरील व्यक्ती आहेत. त्यांच्या वर्तनातून राज्याची प्रतिष्ठा दिसून येते,” असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. राज्यपालांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात असतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असेही म्हणण्यात आलं.

 ‘जबाबदारीनुसार वर्तन अपेक्षित’ – AKP नेत्यांची टीका 

तर राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान यांच्या सत्ताधारी AKP पक्षाचे माजी खासदार सामिल तय्यार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ‘ प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक आयुष्यात आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्यपालांसारख्या उच्च पदावरील व्यक्तींनी सार्वजनिक जबाबदारी लक्षात घेऊन पोशाख आणि वर्तनाबाबत अधिक काळजी घ्यायला हवी’, असं त्यांनी म्हटलं.

राज्यपालांचं चोख प्रत्युत्तर

मात्र या टीकेनंतर राज्यपाल मेहमत फतिह सिसेकली यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. आपण कोणतेही अनुचित कपडे परिधान केले नव्हते. “मी सायकलिंगसाठी तयार केलेले सामान्य स्पोर्ट्सवेअर वापरले होते. हे खेळाडूंसाठी बनवलेले कपडे आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. सिसेकली हे सायकलिंगसोबतच जलतरण आणि रोइंगचा सराव करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे, आपण भविष्यातही सायकलिंग सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पोशाख नव्हे, काम पहा – राज्यपालांच्या समर्थनार्थ लोकं रस्त्यावर

या घटनेनंतर राज्यपालांच्या समर्थनार्थ अनेक नागरिक पुढे आले. विरोधी पक्ष समर्थक हल्क टीव्हीच्या माहितीनुसार, सिसेकली यांना पदावर कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन मोहिमेला 10 हजारांहून अधिक लोकांनी पाठिंबा दिला. सिसेकली यांनी अर्दहानमध्ये क्रीडा संस्कृती वाढवणे, युवकांसाठी उपक्रम राबवणे आणि सायकल पर्यटनाला प्रोत्साहन देणे यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कपड्यांपेक्षा त्यांच्या कामाचा विचार केला पाहिजे, असं समर्थकांचं म्हणणं आहे.

22 जुलै, बुधवारी अर्दहानमधून निरोप घेताना मेहमत फतिह सिसेकली भावूक झाले. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचा विश्वास मी कधीही तोडला नाही, असं ते यावेळी म्हणाले.

 

Follow Us