AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूयॉर्कच्या आकाशात पुन्हा उभे राहिले ट्वीन टॉवर, 2,977 ड्रोनद्वारे 9/11 च्या हल्ल्यातील पीडीतांना अनोखी श्रद्धांजली…

9/11 च्या 25व्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्क हार्बर मध्ये 2,977 ड्रोनी आकाश प्रकाशित केले. प्रत्येक प्रकाश हा एका जीवाच्या स्मृतींना उजाळा देणारी होती. हर ड्रोनने तयार झालेल्या ट्विन टॉवर्सच्या दृश्यांने अनेकांना भावूक केले.

न्यूयॉर्कच्या आकाशात पुन्हा उभे राहिले ट्वीन टॉवर,  2,977 ड्रोनद्वारे 9/11 च्या हल्ल्यातील पीडीतांना अनोखी श्रद्धांजली...
| Updated on: Sep 11, 2026 | 7:03 PM
Share

न्यूयॉर्क हार्बरचे आकाश त्यावेळी प्रकाशाने उजळले जेव्हा ११ सप्टेंबर २००१ रोजीच्या अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या २,९७७ लोकांच्या स्मृतींना श्रद्धांजली देण्याची हजारो ड्रोन आकाशात उडाली. ९/११ हल्ल्याच्या २५ व्या स्मृतीदिनाच्या पूर्व संध्येला २,९७७ ड्रोननी आकाशात अमेरिकेचे शक्ती स्थान असलेल्या दोन टॉवरची प्रतिकृती हवेत तयार केली आणि हे दृश्य पाहून लोक भावूक झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अमेरिकेच्या परिवहन सचिव सीन डफी यांनी या खास ड्रोन शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की आकाशात दिसणारा प्रत्येक प्रकाश ९/११ च्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीला समर्पित होती. म्हणजे एकूण २,९७७ ड्रोन २,९७७ मृत नागरिकांच्या स्मृती निमित्त आकाशात चमकत होते.

आकाशात लिहिली ९/११ दर्दभरी कहाणी

या खास कार्यक्रमाचे नाव 2,977 Lights Over New York Harbor असे ठेवण्यात आले होते. ड्रोनला अत्यंत सुंदरपणे असे उडविण्यात आले की रात्री आकाशात काही क्षणात प्रसिद्ध ट्वीन टॉवरच्या दोन इमारती उभ्या असलेल्या दिसल्या, या त्याच इमारती होत्या ज्यावर ११ सप्टेबर रोजी हल्ल्यात नष्ट झाले होते. हा केवळ एक ड्रोन शो नव्हता तर त्या लोकांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न होता ज्या या अतिरेकी हल्ल्यात बळी गेल्या. या हल्ल्यात प्राण गमावल्यांचे नातेवाईक, वाचलेले नागरिक, फर्स्ट रिस्पॉन्डर्स आणि या सर्वच लोकांना ही श्रद्धांजली होती.

शॉन डफी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी याला अमेरिकेच्या सामर्थ्याची आणि इतरांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या शूर लोकांची आठवण म्हटले. त्यांनी पीडित, त्यांचे कुटुंबीय आणि त्या दिवशी सेवा बजावलेल्यांचे स्मरण केले आणि ते कधीही विसरले जाणार नाहीत असे म्हटले.

ड्रोन कंपनी ‘स्काय एलिमेंट्स ड्रोन’नेही आपल्या ‘एक्स’ (X) खात्यावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. कंपनीने स्पष्ट केले की, न्यूयॉर्क हार्बरवर दिसणारा प्रत्येक प्रकाश हा ९/११ रोजी गमावलेल्या एका जीवाचे प्रतीक होता. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी या दृश्याचे वर्णन सुंदर आणि हृदयस्पर्शी असे केले. काहींनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले, तर काहींनी भविष्यात असे तंत्रज्ञान केवळ शांततापूर्ण आणि चांगल्या कामांसाठीच वापरले जावे अशी आशा व्यक्त केली.

येथे व्हिडीओ पाहा –

अनेकांनी आपल्या भावना मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या. एकाने लिहिले, “कधीही विसरू नका,” तर दुसऱ्याने म्हटले, “ही एक अद्भुत आणि भावनिक श्रद्धांजली आहे.” ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांच्यासाठी रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या हजारो दिव्यांनी ९/११ च्या आठवणी जाग्या केल्या.

Follow Us
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं