चुकीला माफी नाही, चीनच्या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना फाशी, राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचा कठोर निर्णय

चीनने त्यांच्या दोन माजी संरक्षण मंत्र्यांनी मृत्यूदंड सुनावल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्या आदेशाने झाली आहे.

चुकीला माफी नाही, चीनच्या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना फाशी, राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचा कठोर निर्णय
Former Chinese Defense Ministers Li Shangfu (left) and Wei Fenghe (right)
| Updated on: May 07, 2026 | 7:01 PM

बीजिंगः चीनने त्यांच्या दोन माजी संरक्षण मंत्र्याने मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्या आदेशाने झाली आहे. या दोन्ही संरक्षण मंत्र्यांना भ्रष्टाचाराचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

व्ही फेंघे आणि ली शांगफू यांना मृत्यूदंड

चीनने त्यांच्या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना भ्रष्टाचार प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. व्ही फेंघे आणि लि शांगफू यांना भ्रष्टाचार प्रकरणात ही कठोर शिक्षा देण्यात आली आहे.चीनची सरकारी वृत्त एजन्सी शिन्हुआच्या बातमीनुसार दोन्ही संरक्षण मंत्र्यांना वेग-वेगळी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टाने ठेवला लाचखोरीचा आरोप

चीनच्या एका कोर्टाने फेंघे यांना लाच घेतल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. तर अन्य एक माजी संरक्षण मंत्री शांगफू यांना लाच घेणे आणि देणे दोन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर दोन्ही माजी मंत्र्यांना या प्रकरणात मृत्यूदंडाची सजा सुनावण्यात आली आहे. फेंघे यांच्यानंतर शांगफू हे संरक्षण मंत्री झाले होते. मात्र, नंतर तेही भ्रष्टाचारात अडकले. आणि त्यांना २०२४ मध्ये सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीतून बडतर्फ करण्यात आले.

झिनपिंग यांनी जवळच्या सहकाऱ्यांनाही सोडले नाही

विशेष म्हणजे चीनने आपल्या ज्या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. त्या दोघांनीही राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्या सानिध्यात काम केले आहे. ते झिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य देखील होते. तरीही झिनपिंग यांनी त्यांना दया दाखविली नाही. त्यावरुन झिनपिंग हे भ्रष्टाचाराविरोधात किती कठोर आहेत हे स्पष्ट होते.

शी झिनपिंग यांनी फेंघे यांना दिले होते पद

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी स्वत:च व्ही फेंघे यांना संरक्षण मंत्री म्हणून निवडले होते. फेंघे साल २०१८ ते २०२३ पर्यंत संरक्षण मंत्री होते. तर शांगफू यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला होता. फेंघे आणि शांगफू हे दोघेही एअरोस्पेस इंजिनिअर होते. दोघांनी २०१५ मध्ये स्थापित पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अति महत्वाच्या रॉकेट फोर्सचे नेतृत्व केले होते. फेंघे यांना बडतर्फ केल्यानंतर अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना पदावरुन हटवण्यात आले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले गेले. शी झिनपिंग यांनी २०१२ मध्ये सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराच्या विरोधात व्यापक मोहिम सुरु केली आहे.ज्यात अनेक सैन्य जनरल सह दहा लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us