दिवाळीत बाईक घेऊनच टाका! Yamahaची धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर; कोणत्या गाड्यांवर सूट?
यंदाच्या दिवाळीत एखादी नवी कोरी बाईक घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यामाहा कंपनीकडून दिवाळीनिमित्त विशेष फेस्टिव्ह ऑफर देण्यात आली आहे.

Yamaha special festive offer: देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिवाळी म्हटलं की नवीन वाहनांची खरेदी आलीच. तुम्हीही यंदाच्या दिवाळीत एखादी नवी कोरी बाईक घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यामाहा कंपनीकडून दिवाळीनिमित्त विशेष फेस्टिव्ह ऑफर देण्यात आली आहे. कंपनी निवडक स्कूटर आणि बाईक्सवर विमा लाभ आणि कमी डाउन पेमेंटची ऑफर देत आहे. या ऑफर्सअंतर्गत, ग्राहक फक्त 2499 रुपयांच्या डाउन पेमेंटवर यामाहा स्कूटर घरी आणू शकतात.
कंपनीच्या काही बाईक्सवर देखील कमी डाउन पेमेंटचे पर्याय उपलब्ध आहेत. यामाहा मोटर इंडियाचे विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, रवींदर सिंग यांच्या मते, दिल्लीत प्रीमियम आणि परफॉर्मन्स टू-व्हीलर्सची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन, कंपनी या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खरेदी सोपी आणि परवडणारी बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
कोणत्या गाड्यांवर खास ऑफर?
या फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत, Fascino 125 आणि RayZR 125 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3999 रुपयांचा विमा लाभ मिळत आहे. याव्यतिरिक्त कंपनीच्या हायब्रीड स्कूटर रेंजवर फक्त 2499 रुपयांपासून सुरू होणारे डाउन पेमेंट उपलब्ध आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना कमी डाऊन पेमेंटमध्ये यामाहा स्कूटर्स खरेदी करता येतात. डाउन पेमेंटनंतर उर्वरित रक्कम फायनान्स किंवा इतर उपलब्ध पर्यायांद्वारे भरावी लागेल.
FZ सिरीज आणि XSR155 वरही मोठी सूट
कंपनीच्या बाईक्स खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष ऑफर्स देखील सादर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना निवडक यामाहा FZ सिरीज बाईक्सवर ₹5,999 चा विमा लाभ मिळेल. या सिरीजमधील बाईक्स खरेदी करण्यासाठी ₹3,900 पासून सुरू होणारा डाउन पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, यामाहा XSR155 वर देखील ₹5,555 चा विमा लाभ मिळतो. याचा अर्थ असा की, ही बाईक खरेदी करणारे ग्राहक देखील या फेस्टिव्ह ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
R15 आणि MT-15 साठी किती डाउन पेमेंट भरावं लागेल?
स्पोर्ट्स बाईक्सना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांनाही कंपनीने दिलासा दिला आहे. ग्राहक R15 आणि MT-15 वर ₹4,999 पासून सुरू होणाऱ्या डाउन पेमेंट पर्यायांचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी असून दिल्ली-एनसीआरमधील अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहेत. मॉडेल आणि फायनान्स पर्यायांनुसार ऑफरच्या अटी बदलू शकतात, असं कंपनीने स्पष्ट केले आहे.
