
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष आणि रिपब्लिक पार्टीचे नेते डोनाल्ड ट्रम्प हश मनी प्रकरणात दोषी ठरले आहे. अमेरिकेतील न्यायालयाने हश मनी ट्रायल प्रकरणातील सर्व 34 प्रकरणांमध्ये ट्रम्प यांनी दोषी ठरवले आहे. त्यावर शिक्षा आता 11 जुलै रोजी जाहीर होणार आहे. ट्रम्प यांनी किती शिक्षा होणार हे न्यायालयावर अवलंबून आहे. ट्रम्प यांनी दोषी ठरवलेले हश मनी प्रकरण काय आहे… हे प्रकरण का इतके गंभीर आहे…
2016 मध्ये व्हाइट हाऊसमध्ये येण्यापूर्वी माजी पोर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स सोबत ट्रम्प असलेले यौन संबंध लपवण्याचे हे प्रकरण आहे. त्यांच्यावर या प्रकरणात 34 आरोप आहेत. हे प्रकरण लपवण्यासाठी त्यांनी 1,30,000 डॉलर स्ट्रॉर्मीला दिल्याचा आरोप आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रकरणात सातत्याने हश मनी शब्दाचा वापर केला जात आहे. अमेरिकेत दुसऱ्या इतर प्रकरणापेक्षा हा प्रकार अधिक गंभीर आहे. एखाद्या अत्याचाराच्या प्रकरणापेक्षाही हे प्रकरण गंभीर मानले जाते. हश मनी म्हणजे एखादा व्यक्ती किंवा पार्टी दुसऱ्यास आर्थिक प्रलोभन देतो की त्यांच्यात निर्माण झालेले शारीरिक संबंधाची वाचत्या करु नये. जो व्यक्ती हा यौन संबंधाचा खुलासा करणारा असू शकतो, त्याला रक्कम दिली जाते.
अमेरिकेत या पैशाच्या नोंदी ठेवणे ही एक गंभीर आणि कायदेशीर बाब आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही ते तुमच्या कंपनीकडून किंवा तुमच्या पैशाच्या नोंदीतून देत असाल तेव्हा तो गंभीर प्रकार असतो. या पैशाचा व्यवहार तो व्यक्ती गप्प बसावा म्हणून केलेला असतो. या व्यवहाराच्या नोंदी 34 स्टेप्समध्ये दाखवल्या होत्या. यामुळे सर्व 34 प्रकरणांमध्ये ज्युरींनी ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या खात्यांच्या लेजरवरून स्पष्टपणे दिसून येते की त्यांनी हुश मनीसाठी खोटे रेकॉर्ड केले आहे.
हश मनीच्या आरोपामुळे चार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये ट्रम्प यांना किती शिक्षा होणार हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा असल्याने त्यांना अत्यंत किरकोळ शिक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यांना फक्त $5000 दंड भरण्यास सांगितले जाईल. ट्रम्प पहिल्यांदाच गुन्हेगार असल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.