यूक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला, काय युरोपने लिहिली हल्ल्याची स्क्रीप्ट? झेलेन्स्की यांनी कसा घडवला मोठा अनर्थ?
Russia And Ukraine War : यूक्रेनकडून रशियावर तीन वर्षातील सर्वात मोठा हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली क्रेमलिनमध्ये रशियन सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक झाली. त्यामुळे आता रशिया मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

Russia And Ukraine War : राशिया आणि यूक्रेन युद्ध आता आणखी भडकले आहे. यूक्रेनकडून रशियावर तीन वर्षातील सर्वात मोठा हल्ला करण्यात आला. यूक्रेनने रशियावर शक्तीशाली ड्रोन हल्ला करत रशियाची 40 अत्याधुनिक लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. या हल्ल्यात युक्रेनने रशियाच्या सैन्याचेही मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतीन संतापले आहे. कारण तीन वर्षानंतर प्रथमच युक्रेनने रशियावर इतका भीषण हल्ला केला आहे. रशियावर यूक्रेन इतका मोठा हल्ला कसा करु शकला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
रशियाच्या चार एअर बेसवर आणि नेव्हल बेसवर हवाई संरक्षण प्रणाली तैनात होती. ती प्रणाली अपयशी कशी ठरली? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामागे युरोप आणि नाटोचे षड्यंत्र आहे का? तसेच आता पुतीन या हल्ल्यास कसे उत्तर देणार? हे प्रश्नही निर्माण झाले आहे. रशियावर मोठा हल्ला करत यूक्रेनने पुतीन आणि त्यांच्या सैन्याला मोठा धक्का दिला आहे. तीन वर्षात प्रथमच यूक्रेन रशियाच्या इतक्या आतमध्ये पोहचला आहे. यावर विश्वास ठेवणे अवघड होत आहे. परंतु यूक्रेनने दावा करत काही व्हिडिओ शेअर केले आहे.
युरोप आणि नाटोवर संशय
यूक्रेन हा हल्ला स्वत:च्या ताकदीवर करु शकत नाही, असे म्हटले जात आहे. यामागे युरोप आणि नाटो असल्याचा संशय व्यक्त केले जात आहे. रिपोर्टनुसार, नाटोने यूक्रेनला इंटेलिजेन्स दिले. नाटोने ही सॅटेलाइटच्या माध्यमातून यूक्रेनला लोकेशन दिले. त्यानंतरच यूक्रेन रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त करु शकला. नाटोने रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीला हॅक केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे रशियाची हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार यूक्रेनचा हल्ला रोखू शकली नाही.
युक्रेनच्या या मोठ्या हल्ल्यानंतर क्रेमलिनमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली क्रेमलिनमध्ये रशियन सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक झाली. त्यात पुतिन यांनी युरोपीय देशांवर मोठे हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात, झेलेन्स्कीच्या ऑपरेशन पर्ल हार्बरनंतर आता रशिया मोठे पाऊल उचण्याची शक्यता आहे. पुतिन आणि त्यांचे सैन्य या हल्ल्याचा बदला नक्कीच घेतील. या हल्ल्यामुळे केवळ युक्रेनच नाही तर युरोपातील अनेक देशांवर संकट येऊ शकते.
