Ukraine Russia War | तू भावाला कुठे विसरली?, तू त्याला कुठे सोडून आली?, युक्रेनमधून परतलेल्या मुलीला आईचे ह्रदयद्रावक सवाल

| Updated on: Mar 07, 2022 | 9:45 AM

उत्तर प्रदेशमधल्या कानपुरमधील एक लेक युक्रेनमधून सुखरुप घरी परतली. मात्र, आपली लेक घरी आल्यानं देखील तिच्या आईला आनंद झालेला नव्हता. याचवेळी आईने मुलीवर प्रश्नांची सरबती केली. तुझ्या भावाला तू कुठे सोडून आली, तू त्याला कुठे विसरली, असे ह्रदयद्रावक प्रश्न आईने युक्रेनमधून परतलेल्या आपल्या मुलीला केले. हे ह्रदयद्रावक प्रश्न ऐकताच उपस्थितांच्या अंगावर काटा आला.

Ukraine Russia War | तू भावाला कुठे विसरली?, तू त्याला कुठे सोडून आली?, युक्रेनमधून परतलेल्या मुलीला आईचे ह्रदयद्रावक सवाल
मधुरिमा आणि त्यांची युक्रेनमधून परतलेली लेक
Follow us on

कानपूर : उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) कानपुरमधील(Kanpur) एक लेक युक्रेनमधून सुखरुप घरी परतली. मात्र, आपली लेक घरी आल्यानं देखील तिच्या आईला आनंद झालेला नव्हता. याचवेळी आईने मुलीवर प्रश्नांची सरबती केली. तुझ्या भावाला तू कुठे सोडून आली, तू त्याला कुठे विसरली, असे ह्रदयद्रावक प्रश्न आईने युक्रेनमधून परतलेल्या आपल्या मुलीला केले. हे ह्रदयद्रावक प्रश्न ऐकताच उपस्थितांच्या अंगावर काटा आला. एकीकडे लेक सुखरुप युक्रेनमधून परतली होती. तर दुसरीकडे मुलगा विसरल्याचे दु:ख्ख त्या आईला होते. मुलीच्या येण्याचा आनंद साजरा करत असताना आईच्या डोळ्यात मात्र आपल्या दुसऱ्या लेकराची चिंता स्पष्ट दिसत होती. आईच्या डोळ्यात तरळणारे आश्रृ स्पष्टपणे तिच्या वेदना सांगत होते. आपलं लेकरु कधी येणार, ते कुठे विसले, असे प्रश्न आई वारंवार करत होती.

बॉम्ब हल्ल्यानंतर भाऊ नजरेआड

युक्रेनमधून उत्तर प्रदेशातील कानपुरात परतलेल्या मुलीचे नाव अक्षरा यादव आहे. चार दिवसांपूर्वी खारकिव स्टेशनवर जेव्हा अक्षरा आली. त्यावेळी त्यांनी खारकीवमधून भारताकडे जाण्याची तयारी केली होती. अक्षरा आणि तिचा भाऊ आरव यादव ट्रेनमध्ये बसण्यासाठी तयार होते. त्याचवेळी स्टेशनजवळ बॉम्ब हल्ला झाला. यामुळे स्टेशनवर मोठी गर्दी झाली. याच गर्दीत अक्षराचा भाऊ आरव नजरेआड झाला. यानंतर अक्षरा अनेक प्रयत्न करुन पोलंड बॉर्डरवर पोहचली. त्यानंतर रविवारी उत्तर प्रदेशातील कानपुरात ती दाखल झाली. पण, अक्षराचा भाऊ मात्र अजूनही युक्रेनमध्येच अडकला आहे. यामुळे मुलाच्या परतन्यानंही आईला आपल्या दुसऱ्या लेकराची चिंता सतावत आहे.

शिक्षणासाठी भावंड होते युक्रेनला

उत्तर प्रदेशातील कानपुरच्या ग्वालटोलीची राहणारी डॉक्टर मधुरिमा सिंह यांची मुलगी अक्षरा आणि मधुरिमा यांचा मुलगा आरव यादव हे दोघे भावंड वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते. युक्रेनमध्ये दोन्ही भावंड सोबतच एमबीबीएस करत होते. युक्रेन-रशियाचं युद्ध सुरु झाल्यावर त्यांना युक्रेनमधून निघण्याचे प्रयत्न केले. मात्र, अनेकदा त्यांना अपयश आले. यात अक्षरा कशीबशी पोलंडमार्गे भारतात आली. मात्र, तीचा भाऊ तिथेच अडकला. अक्षराच्या आईने तिच्या मुलाला युक्रेनमधून सुखरुप भारतात आणण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War Live : रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनमधील रहिवासी इमारती उद्ध्वस्त

शस्त्रे खाली टाकून मागण्या मान्य करा तरच युद्ध थांबेल; पुतीन यांचा पुन्हा एकदा युक्रेनला इशारा

Russia Ukraine War Live : आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेल्या 15920 भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले – सिंधिया