
भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला आहे आणि सातत्याने भारताला टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावले जात आहे. दुसरीकडे आता जगामध्ये खळबळ उडाली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांनी मोठा इशारा दिला आहे. जेलेंस्की यांनी म्हटले की, जोपर्यंत खरी न्यापूर्ण शांती मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे. आपले भविष्य आपण स्वत: ठरवणार आहोत तर दुसरे कोणीही नाही. जेलेंस्की यांनी थेट जगाला हा इशारा देत रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करत थेट हल्ला केला. त्यांनी म्हटले की, या युद्धाने युक्रेन तुटला नाही तर अजून जास्त मजबूत झाला आहे.
आपला रस्ता अवघड आहे पण हार मानली नाही. पुढील काळात हे युद्ध अधिक तीव्र होणार असल्याचे थेट त्यांनी संकेत दिले आहेत. युक्रेनने रशियाच्या अणुऊर्जा यंत्रणांना आता टार्गेट केल्याचे दिसत आहे. युक्रेनने केलेल्या रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याच्या बातमीने जगभरात चिंता पसरली. आता रशियाकडून जोरदार प्रतिउत्तर युक्रेनला दिले जाणार असल्याचे सांगितले जातंय. दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि प्लांटची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे.
युक्रेनने केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले, याबाबतची माहिती ही पुढे येऊ शकली नाहीये. मात्र, या हल्ल्यानंतर आग लागल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्यानंतर रशियाच्या अधिकाऱ्यांनी लगेचच ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केली आणि आग आटोक्यात आली. दुसरीकडे, यामुळे जगात चिंताही वाढत आहे. पाश्चिमात्य देशांना भीती आहे की, जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर केवळ युरोपच नाही तर संपूर्ण जगाला ऊर्जा संकट, अन्न संकटाचा सामना करावा लागेल.
तज्ञांचे मत आहे की, आता युद्ध फक्त रशिया आणि युक्रेनचा विषय नाही तर संपूर्ण जगाचे आहे. यामुळे दोन्ही देशांनी कोणतेही पाऊल उचलताना पूर्ण विचार करावा. मात्र, युक्रेनने रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर थेट ड्रोन हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आता तणाव अधिक वाढल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. त्यामध्येच वोलोदिमिर जेलेंस्की यांनी केलेल्या भाषणाने विविध चर्चांना उधाण आलंय.