मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ देशाने दिला मोठा धक्का, थेट अमेरिकेला इशारा देत धमकी
टॅरिफचा तणाव टोकाला पोहोचलेला असतानाच आता अमेरिका मोठा झटका देण्यात आला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिका सातत्याने धमक्या देत असताना अमेरिकेच्या विरोधात अजून एक देश मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. भारत आणि अमेरिकेमधील तणाव वाढला असून भारतावर 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अजूनही दोन्ही देशांमध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. मात्र, मार्ग निघण्याची शक्यता फार कमी आहे. अमेरिकेकडून भारताला धमकावले देखील जात आहे. आता अमेरिकेच्या समस्यांमध्य मोठी वाढ झाली आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अनेक देशांनी पुढे येऊन अमेरिकेवर जोरदार टीका केली असतानाच आता अजून एका मोठ्या देशाने अमेरिकेला जोरदार धक्का दिला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना थेट आव्हानच दिले आहे. तेहरान काहीही झाले तरीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या पुढे आणि त्यांच्या दबावा पुढे झुकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोठा धक्काच इराणकडून अमेरिकेला म्हणावा लागणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे.
हेच नाही तर त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा अणु चर्चा सुरू करणार असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. यावेळी अयातुल्ला अली खामेनेई यांनी युरोपीय देशांना मोठा इशारा दिला आहे. जूनमध्ये 12 दिवसांच्या इराण-इस्रायल संघर्षादरम्यान इराणमधील अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यांनंतर तेहरानने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी (IAEA) सहकार्य थांबवले आहे. सध्या संघर्ष टोकाला पोहोचल्याचे बघायला मिळत आहे.
इराण आणि अमेरिकेमधील वाद हा नवीन नाही. दोन्ही देशांना एकमेकांवर विश्वास नाहीये. आता अमेरिका याबद्दल काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, अमेरिकेकडून इराणवर दबाव टाकण्याचे काम सुरू असले तरीही अयातुल्ला अली खामेनेई यांनी स्पष्ट केले की, काहीही झाले तरीही ते झुकणार नाही. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर देखील रशियाकडून कच्चे तेल न खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यानेच त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे.
