जग हादरलं! मी राष्ट्राध्यक्षपद सोडण्यास तयार पण… रशिया युक्रेन युद्धात मोठी खळबळ

Russia Ukraine war : गेल्या काही वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचे जीव गेले. मात्र, युद्ध काही थांबले नाही. या युद्धाची झळ भारताला देखील बसताना दिसत आहे.

जग हादरलं! मी राष्ट्राध्यक्षपद सोडण्यास तयार पण... रशिया युक्रेन युद्धात मोठी खळबळ
Vladimir Putin and Volodymyr Zelensky
| Updated on: Sep 25, 2025 | 4:12 PM

मागच्या तीन वर्षाहूनही अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबावे याकरिता भारतावर मोठा टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर त्यांनी नाटो देशांनाही पत्र पाठवत म्हटले की, चीनवर 50 टक्के किंवा 100 टक्के टॅरिफ लावा. भारत आणि चीनवर दबाव टाकण्याचे काम अमेरिका करत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचा शांततेचा मार्ग दिल्लीहून जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद करावी, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबेल, असाही दावा अमेरिकेने केला. अमेरिकेच्या अटी मान्य न करत भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.

युक्रेनमधील लोकांचे रशियाच्या हल्ल्यात जीव जात आहेत आणि याला रशियाकडून तेल खरेदी करणारे देशच जबाबदार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाबद्दल बोलताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की, रशियासोबतच युद्ध संपले तर मी अध्यक्षपद सोडण्यास तयार आहे. मुळात म्हणजे रशियाने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, वोलोदिमिर जेलेंस्की यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार नाहीत.

कारण आम्हाला कोणताही करार करण्यासाठी युक्रेनच्या संविधानानुसार, त्या पदावरील व्यक्ती पाहिजे. कायद्यानुसार, वोलोदिमिर जेलेंस्की हे अध्यक्षपदावर राहून शकत नाहीत आणि ते बेकायदेशीर या पदावर बसले आहेत. त्यामध्येच आता वोलोदिमिर जेलेंस्की यांनी त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल हे धक्कादायक असे विधान केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांनी अ‍ॅक्सिओस न्यूज वेबसाइटशी बोलताना हे विधान केले.

रशियासोबतचे युद्ध संपल्यानंतर ते आपले पद सोडण्यास तयार आहेत. वोलोदिमिर जेलेंस्की हे त्यांच्या स्वार्थासाठी हे युद्ध अधिक खेचत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, त्यामध्येच त्यांनी स्पष्टपणे आपल्या अध्यक्षपदावर भाष्य केले. वोलोदिमिर जेलेंस्की यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला जात डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतरही काहीच मार्ग निघू शकला नाही.