AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी खतरा! पाकिस्तान आणि बांगलादेशाकडून मोठा कट? काही तास बैठक आणि…

श्रीलंकेतही उद्रेक पेटला होता. त्यामध्येच आता भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा पुढे येताना दिसतंय. बांगलादेशसोबत जवळीकता वाढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. महत्वाची एक बैठक नुकताच पार पडली आहे.

भारतासाठी खतरा! पाकिस्तान आणि बांगलादेशाकडून मोठा कट? काही तास बैठक आणि...
Shahbaz Sharif and Muhammad Yunus
| Updated on: Sep 25, 2025 | 2:19 PM
Share

भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठी अस्थिरता बघायला मिळाली. काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये तरूणांनी न्यायपालिका, संसद जाळली. हजारो युवक रस्त्यावर उतरले. हेच नाही तर मंत्र्यांची घरे देखील पेटून दिली. त्यापूर्वी मोठा उद्रेक बांगलादेशातही बघायला मिळाला. हजारो लोक रस्त्यावर उतरली होती. श्रीलंकेतही उद्रेक पेटला होता. त्यामध्येच आता भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा पुढे येताना दिसतंय. बांगलादेशसोबत जवळीकता वाढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. बांगलादेशातील सध्याचे अंतरिम सरकार आणि माजी सत्ताधारी अवामी लीग पक्ष यांच्यातील संघर्ष वाढला आहे. देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दोन्ही नेते भेटले. न्यू यॉर्कमध्ये दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. काही काळ दोघांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती पुढे आलीये. युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम म्हणाले की, या बैठकीत पाकिस्तान आणि बांगलादेशमधील व्यापार आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. दोघांमधील ही दुसरी भेट आहे. यापूर्वीही यांच्यामध्ये भेट झाली होती.

प्रादेशिक राजकारणासारख्या मुद्द्यांमुळे हसीना सरकार आणि पाकिस्तानमधील संबंध कधीही फार व्यवस्थित राहिले नाहीत. मात्र, ना पाकिस्तान ना बांगलादेश दोन्ही नेत्यांमध्ये थेट न्यू यॉर्कमध्ये भेट झाली. काही तास दोघांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबद्दलची फार काही माहिती ही पुढे येऊ शकली नाहीये. मात्र, यामुळे भारताचे टेन्शन वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगामवर केला. त्यानंतर भारताने सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून मोठा हल्ला केला आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थ केली. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने थेट अमेरिकेचे पाय पकडले. साैदी अरेबियासोबतही पाकिस्तानने मोठा सुरक्षा करार केला आहे. त्यामध्येच आता या भेटीला महत्वप्राप्त झाले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.