होर्मुजवर पुन्हा तणाव वाढला, जहाजावर भीषण हल्ला; जलवाहतुकीत अडथळा , नेमकं काय घडलं?

strait of hormuz : होर्मुजच्या सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा एका जहाजावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

होर्मुजवर पुन्हा तणाव वाढला, जहाजावर भीषण हल्ला; जलवाहतुकीत अडथळा , नेमकं काय घडलं?
| Updated on: Jun 26, 2026 | 7:56 AM

होर्मुजची सामुद्रधुनीवर पुन्हा तणाव वाढला आहे. एका जहाजावर हल्ला झाल्यानंतर संयुक्त सागरी संस्थेने जहाजांना बाहेर काढण्याचं कामकाज थांबवलं आहे. ओमानच्या किनार्‍याजवळ हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. जहाजांच्या सुरक्षतेची खात्री देत नाही, तोपर्यंत होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांना बाहेर काढण्याचं काम स्थगित राहील, अशी भूमिका आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने घेतली आहे.

जहाजावर कोणी आणि नेमक्या कोणत्या जहाजावर हल्ला झालाय, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या मान्यता प्राप्त मार्गावरून तेहरानच्या परवानीशिवाय जाऊ नये’, असा इशारा इराणने आधीच दिला होता.

संयुक्त राष्ट्राने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांना बाहेर काढण्याचं काम थांबवलं आहे. ब्रिटिश सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्याजवळ गुरुवारी जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला झालाय’. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे प्रमुखांनी सांगितलं की, यादीत नमूद केलेली जहाजे आणि संपूर्ण परिसरातील सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल’.

होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजावर क्षेपणास्त्र कोणी डागली आणि कोणत्या जहाजाला लक्ष्य केलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ला झाल्यानंतर काही वेळातच इराणने मोठी धमकी दिली. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखण्याची धमकी इराणने दिली.

इस्त्रायलच्या हल्ल्यात 3 ठार

तत्पूर्वी, दक्षिण लेबनानच्या नबातीयेहच्या बाहेरील भागात इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. वॉशिंग्टनमध्ये चर्चा सुरू असताना हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. इस्त्रायली सैन्याच्या ताब्यात असलेल्या दक्षिण लेबनॉनमधील संबंधित भागातून ये-जा करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. लेबनॉनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे’. दरम्यान, एकीकडे युद्ध थांबवल्याची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा होर्मुजच्या सामुद्रधुनीवर एका जहाजावर हल्ला झाल्याने जगात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारतासहित जगाचं टेन्शन वाढल्याचे सांगितले जात आहे. आता या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us