
लंडनमध्ये एक लाखांहून अधिक नागरिक रस्त्यांवर उतरल्याने हा विषय जगभरात चर्चेस आला आहे. शनिवारी लंडनच्या रस्त्यांवर मुंग्यांचे वारुळ फूटावे तसे लोक रस्त्यांवर उतरले होते. येथील सेंट्रल परिसरात एक लाखाहून अधिक लोक रस्त्यावर उतरून निदर्शने केली. हा एण्टी -इमिग्रेशन मोर्चा इतका मोठा होता की त्यामुळे शिस्तबद्ध लंडनच्या वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले. या भल्या मोठ्या मोर्चाचे नेतृत्व एण्टी – इमिग्रेशन एक्टीव्हीस्ट टॉमी रॉबिन्सन करत होते. या मोर्चा दरम्यान अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ले केल्याची माहिती खुद्द पोलिसांनी दिली आहे. अशात सवाल केला जात आहे की एवढी मोठी गर्दी लंडनच्या रस्त्यांवर का उतरली होती. निदर्शनं...