
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. यामुळे फक्त अमेरिकेतच नाही तर जगात खळबळ उडाली. H-1B व्हिसाच्या शुल्कात त्यांनी मोठी वाढ केली असून तब्बल 88 लाख रूपये H-1B साठी भरावी लागणार आहेत. फक्त तेवढेच नाही तर यासोबतच काही नियम आणि अटी बदलण्यात आल्या. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (USC) ने H-1B व्हिसा धारक प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या बदलत्या निर्णयावर मोठा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यापीठांबाबतही नियम बदलला आहे. ट्रम्प प्रशासनाने केलेल्या धोरणात्मक बदलांनंतर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया यांनी स्पष्टपणे इशारा देत म्हटले की, H-1B व्हिसा धारक, कर्मचारी, प्राध्यापक यांनी सध्याच्या पार्श्वभूमीवर आपला आंतरराष्ट्रीय प्रवास पुढे ढकलावा आणि अमेरिकेच्या बाहेर जाणे टाळा.
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, सावधगिरी म्हणून सध्या अमेरिकेत H-1B व्हिसावर असलेल्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना पुढील मार्गदर्शन मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास शक्यतो पुढे ढकलावा. राष्ट्रपतींच्या नवीन घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वी परदेशात राहणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत परतण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले. शक्य तितक्या लवकर अमेरिकेत परत या असेही सांगण्यात आलंय.
अमेरिकेत H-1B व्हिसावर राहणाऱ्या परदेशी व्यावसायिकांवर नवीन इमिग्रेशन ऑर्डरचा थेट परिणाम झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. युनिव्हर्सिटीने आपल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना दिला आहे. 19 सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 21 सप्टेंबरनंतर दाखल होणाऱ्या प्रत्येक नवीन H-1B व्हिसा धारकाला 88 लाख रूपये शुल्क लागणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे अमेरिकेन लोकांना नोकऱ्यांच्या मोठ्या संधी मिळतील.
दरवर्षी अमेरिकेतील विविध युनिव्हर्सिटीमध्ये विदेशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी येतात. या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय प्रतिभावंतांना नोकरीवर ठेवू इच्छिणाऱ्या नियोक्ते आणि विद्यापीठांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अजूनही काही गोष्टी याबद्दलच्या स्पष्ट होत नसल्याने एकच गोंधळ उडाल्याचे यावरून बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना मोठा इशारा युनिव्हर्सिटींनी दिला आहे.