जग हादरले! भारताविरोधात कट? अमेरिकन हवाई दलाचे C-17 विमान थेट पाकिस्तानच्या एअरबेसवर, खळबळ..

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. भारताला सातत्याने अमेरिकेकडून धमकावले जात आहे. फक्त हेच नाही तर रशियाने भारताकडून तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव टाकण्याचे काम अमेरिका करत आहेत. त्यामध्ये आता खळबळ उडून देणारी माहिती पुढे आलीये.

जग हादरले! भारताविरोधात कट? अमेरिकन हवाई दलाचे C-17 विमान थेट पाकिस्तानच्या एअरबेसवर, खळबळ..
Large C-17 Globemaster III aircraft
| Updated on: Sep 06, 2025 | 12:38 PM

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढलाय. त्यामध्येच पाकिस्तानने डाव साधत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जवळीकता वाढवली. मात्र, आता पाकिस्तान आणि अमेरिका भारताच्या विरोधात कट रचत असल्याचा मोठा संशय व्यक्त करण्यात आलाय. एक धक्कादायक माहिती पुढे आली आणि भारतात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकन हवाई दलाचे मोठे C-17 ग्लोबमास्टर III विमान 5 सप्टेंबरच्या पहाटे पाकिस्तानातील नूर खान एअरबेसवर उतरले आहे. अमेरिकेचे इतके मोठे लष्कराचे विमान पाकिस्तानमध्ये उतरल्याने विविध चर्चांना आता तोंड फुटले आहे. पाकिस्तानातील नूर खान एअरबेस हे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख ठिकाण आहे. हा पाकिस्तानी सैन्याचा एक मोठा एअरबेस आहे. तिथे अमेरिकेचे विमान उतरल्याने मोठा कट शिजत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

पाकिस्तानातील रावळपिंडी येथे नूर खान एअरबेस असून हा एअरबेस पाकिस्तानचे एक प्रमुख आणि मोठे लष्करी विमानतळ आहे. आता तिथेच अमेरिकन सैन्याचे विमान आल्याने खळबळ उडाली. आता ही माहिती लिक झाल्यानंतर असे सांगितले जात आहे की, पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे अमेरिकेने मदत पाठवली आहे. या विमानात काही गोळ्या, आैषधे आणि खाण्याचे साहित्य हे अमेरिकेकडून पाठवण्यात आले. मात्र, जगाला आणि भारताला एक वेगळीच शंका आहे.

पाकिस्तानी हवाई दलाचा हा एक महत्त्वाचा एअरबेस आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर याच एअरबेसला टार्गेट करत हल्ला केला होता. भारताच्या ड्रोन हल्ल्यात या एअरबेसचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात होते. शिवाय त्यानंतर पाकिस्तानने या एअरबेसवर कामही करून घेतले. भारताने या एअरबेसवर हल्ला करण्याचे प्रमुख कारण असे होते की, याच एअरबेसवरून पाकिस्तान हा भारतावर ड्रोन हल्ले करत होता. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, नूर खान एअरबेसचे धोरणात्मक महत्त्व खूप जास्त आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयाजवळ आहे आणि C-130 सारखी मोठी लष्करी वाहतूक विमाने इंधन भरण्यासाठी येथे तैनात आहेत. याच इतक्या महत्वाच्या एअरबेसवर अमेरिकेच विमान उतरले. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बऱ्याच काळापासून तणावपूर्ण आहेत. कायमच सीमाभागात तणाव असतो. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतही संबंध ताणले असतानाच अमेरिकेचे विमान पाकिस्तानच्या एअरबेसवर उतरले आहे. या घडामोडींमुळे भारताने सावध भूमिका घेतल्याचे बघायला मिळतंय आणि प्रत्येक बारीक गोष्टीवर भारतीय सैन्याचे लक्ष आहे.