
F-16 हे अमेरिकेच अत्याधुनिक फायटर जेट आहे. लॉकहीड मार्टिन कंपनीने बनवलेलं हे विमान अमेरिकेने जगातील अनेक देशांना विकलं आहे. पाकिस्तानकडे सुद्धा ही F-16 विमानं आहेत. त्याच जोरावर पाकिस्तानला नको तेवढा आत्मविश्वास आहे. F-16 फायटर जेटला अमेरिकेचा स्वाभिमान म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. याच F-16 विमानाला अपघात झाला. अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे बुधवारी F-16 फायटर जेट क्रॅश झालं. अमेरिकन एअर फोर्सच्या एलीट थंडरबर्ड्स स्क्वाड्रनमधील F-16 विमान अचानक कॅलिफोर्नियाच्या ट्रोना एअरपोर्टजवळ कोसळलं. वैमानिक सुरक्षित आहे. तो सुरक्षितरित्या बाहेर पडला. या विमानाचा अपघात कसा झाला, त्याची चौकशी सुरु झाली आहे.
डेथ वॅलीच्या दक्षिणेला वाळवंटात हे विमान कोसळलं. फायटर जेट क्रॅश झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये दिसतय विमान जमिनीवर येऊन कोसळलं. त्याचवेळी वैमानिक सुरक्षितरित्या पॅराशूटमधून बाहेर निघाला. जेट जमिनीवर कोसळताच स्फोट झाला. धुरांचा मोठा लोळ आकाशाच्या दिशेने उठला. दुर्घटनेच्या कारणांची चौकशी सुरु आहे.
F-16C मधून सुरक्षितरित्या इजेक्ट केलं
थंडरबर्ड्सने एक स्टेटमेंट जारी करुन क्रॅश झाल्याची पृष्टी केली. “3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.45 च्या सुमारास कॅलिफोर्नियाच्या आकाशात ट्रेनिंग सेशन दरम्यान थंडरबर्ड पायलटने F-16C मधून सुरक्षितरित्या इजेक्ट केलं” वैमानिकाला किरकोळ दुखापती झाल्या आहेत. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सॅन बर्नार्डिनो काउंटी फायरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. विमानात फक्त एकच वैमानिकच होता”
Moment F-16C fighter jet crashes near Trona Airport in California. https://t.co/ND38ddIP5B pic.twitter.com/knsgPCUFsY
— Breaking911 (@Breaking911) December 3, 2025
कुठे घडला अपघात?
अधिकाऱ्याने या अपघाताबद्दल माहिती देताना सांगितलं की, “दिवसाच्या सुरुवातीला 6 थंडरबर्ड्स जेट्सनी ट्रेनिंगसाठी उड्डाण केलं होतं. पण त्यातली फक्त पाच विमानं परत आली. अज्ञात कारणामुळे विमान नेवल एअर वेपन्स स्टेशन चायना लेकजवळ क्रॅश झालं” सैन्य विमानं उड्डाण ट्रेनिंगासाठी ज्या क्षेत्राचा वापर करतात तिथे ही दुर्घटना झाली. थंडरबर्ड्सची सामान्यत: एअरशो प्रदर्शनाआधी अशी उड्डाणं सुरु असतात. F-16 फायटिंग फाल्कन एक सिंगल-इंजिन मल्टीरोल विमान आहे. थंडरबर्डसची ऐरोबॅटिक प्रदर्शनांमध्ये सहभागी होत असते.