US vs Iran : अख्ख्या इराणला एक USS जेराल्ड आर फोर्डचं पुरुन उरेल असं का म्हणतात?

US vs Iran : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपली सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड मिडिल ईस्टला रवाना केली आहे. या क्षेत्रात USS अब्राहम लिंकन आधीपासूनच आहे.

US vs Iran : अख्ख्या इराणला एक USS जेराल्ड आर फोर्डचं पुरुन उरेल असं का म्हणतात?
uss gerald r ford
| Updated on: Feb 14, 2026 | 3:39 PM

अमेरिका इराणमध्ये तणाव सतत वाढत चालला आहे. अमेरिकेने मिडिल ईस्टमध्ये आपली सैन्य तैनाती वाढवली आहे. अमेरिकेने नुकतीचं USS जेराल्ड आर फोर्ड ही घातक विमानवाहू युद्धनौका इराण जवळच्या समुद्रात पाठवली आहे. रॉयटर्सला शुक्रवारी दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यानुसार जेराल्डला मिडिल ईस्टला पोहोचण्यासाठी एक आठवडा लागेल. तिथे आधीपासूनच अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप आणि दुसऱ्या युद्धनौका तैनात आहेत. या निर्णयामुळे समुद्र आणि आकाश दोन्ही बाजूने इराणवरील दबाव वाढणार आहे.

USS जेराल्ड आर फोर्ड ही एक न्यूक्लियर-पावर्ड कॅरियर एअरक्राफ्ट आहे. यात 75 पेक्षा जास्त विमानं तैनात केली जाऊ शकतात. यात एफ-18 सुपर हॉर्नेट फायटर जेट आणि ई-2 हॉकआय अर्ली वार्निंग सारखी विमानं आहेत. यात अत्याधुनिक रडार सिस्टिम सुद्धा आहे.

याआधी कुठे तैनात होती ही युद्धनौका?

USS जेराल्ड आर फोर्ड याआधी युरोपमध्ये तैनात होतं. पण नोव्हेंबर महिन्यात अचानक या जहाजाला कॅरेबियन समुद्रात जाण्याचे आदेश देण्यात आले. यावर्षी वेनेजुएला येथे झालेल्या अमेरिकी ऑपरेशनमध्ये ही युद्धनौका सहभागी होती. त्याशिवाय गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर, फायटर जेट आणि टेहळणी विमानं मिडिल ईस्टला पाठवण्यात आली आहेत.

ही तैनाती महत्वाची का?

अमेरिकन नौदलाकडे एकूण 11 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. यात खूप महागडी उपकरण बसवलेली आहेत. यांची तैनाती आधीपासूनच ठरलेली असते. मागच्यावर्षी जून महिन्यात इराण-इस्रायल सुद्धा सुरु झाल्यानंतर या भागात अमेरिकेच्या दोन युद्धनौका तैनात होत्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच सांगितलय की, इराण सोबत डील झाली नाही, तर दुसऱ्या युद्धनौकेची गरज लागेल. पुढच्या एक महिन्यात इराणसोबत करार होऊ शकतो. नाहीतर वाईट परिणाम होतील.

USS अब्राहम लिंकन तिथे आहेच

USS अब्राहम लिंकन ही अमेरिकेची शक्तीशाली विमानवाहू युद्धनौका आधीपासूनच अरबी समुद्रात तैनात आहे. इराणची अनेक शहरं या युद्धनौकेच्या स्ट्राइक रेंजमध्ये आहेत. त्याशिवाय अमेरिकेच C 37-B एअरक्राफ्ट सुद्धा इराणमध्ये पोहोचलय. एकूण मिळून अमेरिका इराणचे अणवस्त्र तळ, सैन्य बेस, कमांड सेंटर्सवर समुद्र आणि आकाश दोन्ही बाजूने हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये आहे.