चोरांनी एक लाख अंडी चोरली… महासत्ता अमेरिकेच्या डोक्याला ताप; अंड्यांची किंमत हजारो डॉलर

अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा आणि त्यामुळे झालेल्या किंमतवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी झाल्याचे वृत्त आहे. पेन्सिल्व्हेनियात लाखो डॉलर्सची अंडी चोरण्यात आली आहेत. बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू आणि अंड्यांची कमतरता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना अंड्यांची खरेदी करण्यासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत. पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला आहे.

चोरांनी एक लाख अंडी चोरली... महासत्ता अमेरिकेच्या डोक्याला ताप; अंड्यांची किंमत हजारो डॉलर
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 1:53 PM

जगाच्या नाकीनऊ आणणाऱ्या अमेरिकेच्या नाकात दम निघाला आहे. जगाला गुडघ्यावर टेकवणारा सुपर टॉवर अमेरिका सध्या अंडी चोरणाऱ्या चोरांमुळे बेजार झाला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी होत आहे. पेन्सिलवेनियामध्ये हजारो डॉलरच्या किंमतीचे लाखो अंडे चोरांनी पळवले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या मते, ही चोरी ग्रीन कॅसलमध्ये पीट अँड गेरी ऑर्गेनिक्स LLC मध्ये झाली आहे. या अंड्यांची किंमत 40,000 डॉलर म्हणजे 34,91,425 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिकेत सध्या अंड्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे देशातील अंड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशात रिटेलमध्ये अंड्याची किंमत सरासरी 7.08 डॉलर झाली आहे. गेल्या दोन वर्षातील ही सातपट वााढ आहे. न्यूयॉर्कमध्ये अंड्याच्या कार्टनची किंमत 11.99 डॉलरवर गेली आहे. त्यामुळेच अमेरिकेत अंड्याची चोरी झाली आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. चोरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडी चोरली आणि कुणाला त्याची कानोकान खबरही लागली नाही. चोर आले आणि बिनधास्त अंडी घेऊन गेले. एवढा मोठा माल भरून नेला, तरीही त्यांना कोणीच अडवलं नाही, याचं पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज बघून या चोरांचा तपास करत आहेत.

खरेदीची मर्यादा निश्चित

अमेरिकेत सध्या अंड्याचा पुरवठा कमी आणइ किंमत अधिक अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळेच नागरिकांना अंडी खरेदी करण्यासाठी अधिकची किंमत मोजावी लागत आहे. काही लोक तर अंड्यांच्या किंमती अजून वाढतील म्हणून अंड्यांचा स्टॉक करून ठेवत आहेत. किरकोळ दरात अंडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फक्त तीन कार्टनच विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक कार्टन घेण्याची त्यांना मुभा देण्यात आलेली नाहीये.

म्हणून अंडी महागली

अमेरिकेत अंड्यांची कमतरता होण्यामागचं कारण बर्ड फ्ल्यू असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत ही समस्या निर्माण झाली आहे. बर्ड फ्ल्यूमुळे लाखो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अंड्यांची संख्या कमी झाल्याने अंड्यांचे भाव वाढले आहेत. 2022मध्ये बर्ड फ्ल्यूमुळे 104 मिलियन अंडे देणाऱ्या कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एकट्या ऑक्टोबर महिन्यात 29 मिलियन कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून अंड्यांची टंचाई निर्माण झाली होती.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....