Donald Trump : मनात एक ओठांवर दुसरच, गोड बोलून घात, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचा डबल गेम

Donald Trump : ट्रम्प यांचा हाच विरोधाभास आज भारतात रणनितीक तज्ज्ञासाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. प्रश्न हा आहे की, ट्रम्प वास्तवात आज भारतासोबत उभे आहेत की, फक्त आपला स्वार्थ साधतायत.

Donald Trump : मनात एक ओठांवर दुसरच, गोड बोलून घात, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचा डबल गेम
Donald Trump
| Updated on: Sep 20, 2025 | 9:19 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल खूप चांगलं बोलले. त्यांनी आपण भारताच्या जवळ असल्याच सांगितलं. पीएम मोदींसोबत चांगले संबंध असल्याच सांगितलं. पण त्याचवेळी अमेरिकेने भारताला एक झटका दिला. इराणमधील चाबहार पोर्ट संदर्भात 2018 मध्ये निर्बंधातून दिलेली सवलत रद्द केली. रणनितीक दृष्टीने चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाच आहे. या सवलती अंतर्गत भारतीय कंपन्यांना चाबहार बंदरात काम करण्याची परवानगी मिळालेली. या कंपन्या अमेरिकी निर्बंधांच्या फेऱ्यात येत नव्हत्या. आता निर्बंधांची सवलत रद्द केल्यामुळे भारतीय कंपन्यांना थेट अमेरिकी प्रतिबंधांचा सामना करावा लागेल.

भारत इराणमधील चाबहार बंदर विकसित करत आहे. हे बंदर भारतासाठी मध्य आशिया आणि अफगाणिस्तानपर्यंत व्यापार आणि कनेक्टिविटीसाठी रणनितीक दृष्टया खूप महत्वपूर्ण आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता चर्चा अशी सुरु झालीय की, ट्रम्प गोड बोलून भारताशी डबल गेम खेळत आहेत. ट्रम्प भारत-अमेरिका संबंध मजबूत असल्याचा दावा करतात. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला कठोर आर्थिक आणि कूटनितीक पावलं उचलून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात.

अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांना शक्तीशाली भारत मान्य नाहीय का?

ट्रम्प यांचा हाच विरोधाभास आज भारतात रणनितीक तज्ज्ञासाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. प्रश्न हा आहे की, ट्रम्प वास्तवात आज भारतासोबत उभे आहेत की, फक्त आपला स्वार्थ साधतायत. जागतिक पटलावर भारताच्या स्वतंत्र भूमिकेमुळे ट्रम्प अस्वस्थ झाले आहेत का?. अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांना शक्तीशाली भारत मान्य नाहीय का? म्हणूनच ते आर्थिक आणि कूटनितीक पावलं टाकून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

ट्रम्प यांच्या डेबल गेमची पोल-खोल

“ट्रम्प यांचं भारताबद्दलच धोरण हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे. मोदी यांचं सतत कौतुक करा आणि दुसऱ्याबाजूने फास आवळा. मोदींना महान, खूप जवळचा मित्र आणि खूप चांगलं काम करतायत असं म्हणून ट्रम्प गोड बोलून पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत” असं संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर ब्रह्म चेलानी म्हणाले. त्यांनी ट्रम्प यांच्या डेबल गेमची पोल-खोल केली.


चाबहार बंदर भारतासाठी महत्वाच का?

“रशियाकडून कच्च तेल विकत घेतो म्हणून दुसऱ्या टप्प्यात फक्त भारतावर प्रतिबंध लावणं आणि चाबहारवर निर्बंधांची सवलत रद्द करणं यातून अमेरिकी निती स्पष्ट होते” असं ब्रह्म चेलानी म्हणाले. चीन-पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला काऊंटर करण्यासाठी चाबहार भारतासाठी महत्वाच आहे. राजकीय मंचावर डोनाल्ड ट्रम्प अनेकदा भारताला मजबूत मित्र बोलतात. पण वास्तवात ते अमेरिका फर्स्टचीच कठोर अमंलबजावणी करतात.