
इराण आणि अमेरिका युद्धात कुठे ना कुठे अमेरिका मागे पडली आहे. होर्मुज खाडीच्या मुद्द्यात अमेरिकेने चीनची मदत मागितली होती. पण चीन अमेरिकेच्या मदतीला उतरला नाही. आता चीनकडून अमेरिकेचा मोठा गेम केला जात असल्याची मोठी माहिती पुढे येत आहे. धक्कादायक रिपोर्ट पुढे आलाय. चीनने नुकताच स्पष्ट शब्दात सांगितले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवले पाहिजे आणि शांतता राहिली पाहिजे. चीन युद्धापासून दूर राहण्याबद्दल बोलत असला तरीही जगाच्या गुपचूप चीनने मोठा हस्तक्षेप या युद्धात केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या युद्धात चीन अत्यंत घाणेरडा खेळ खेळत आहे. चीनची सर्वात मोठी चिप मेकिंग कंपनी सेनीकंडक्टर मैन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉरपोरेशनने इराणच्या सैन्याला चिपमेकिंद टूल तयार करून दिला आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इराण निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. वॉशिंग्टन चीनी दूतावास यांनी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे की, इराणसोबत आमचे सामान्य आर्थिक संबंध आहेत. आम्ही इराणच्या काही गोष्टींमध्ये भागीदार आहोत. हा पण सैन्यासंबंधित कोणताही करार इराण आणि चीनमध्ये झालेला नाही. 2020 SMIC वर अमेरिकेने बंदी घातली आहे.
त्यावेळीही चीन आणि कंपनीने म्हटले होते की, त्यांचे चीनच्या लष्करासोबत कोणतेही संबंध नाहीत. यावर आता चीनकडून स्पष्टपणे कोणतीही भूमिका घेतली जात नाही. चीनचे विदेश मंत्री वांग यांनी म्हटले की, चीन प्रत्येक गोष्टीवर चर्चा करण्यास तयार आहे. पण अमेरिकेा सेमीकंडक्टर चीप वरून जे काही आरोप करत आहे, त्यावरून चीन आणि अमेरिकेचे संबंध खराब होऊ शकतात. कारण अमेरिकेच्या निर्णयाचे यापूर्वी थेट चिप क्षेत्रावर परिणाम झाले आहेत.
आता वारंवार हा आरोप अमेरिकेकडून चीनवर केला जात आहे. मात्र, चीनने त्यावर तशी स्पष्ट भूमिका घेतली नाही. काही रिपोर्टमध्ये काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते की, इराणला चीन आण रशिया मदत करत आहे. मात्र, ही मदत नक्की कोणत्या प्रकारची होती, हे सांगण्यात आले नाही. चीनला या युद्धात ओढण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात आला.