AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने पाडले डोनाल्ड ट्रम्प यांना जगापुढे थेट तोंडावर, जगात खळबळ, थेट…

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेकडून इराणबद्दल अत्यंत मोठा दावा करण्यात आला. यावर स्वत: डोनाल्ड ट्रम्प बोलले होते. इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटेपणा पुढे पाडण्यात आला आहे. अमेरिका आणि इराण युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे.

इराणने पाडले डोनाल्ड ट्रम्प यांना जगापुढे थेट तोंडावर, जगात खळबळ, थेट...
Donald Trump and iran
| Updated on: Mar 27, 2026 | 8:11 AM
Share

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. यानंतर इराणकडून आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या ठिकाणांना टार्गेट करून मोठा हल्ला करण्यात आला. आखाती देशात झालेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. अमेरिकेने साधा विचारही केला नव्हता की, अशाप्रकारे इराण उत्तर देईल. या युद्धात इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला सळो की पळो करून सोडले. शेवटी अमेरिकेकडून मोठी घोषणा करण्यात आली की, आम्ही पाच दिवसांकरिता हे युद्ध थांबवत आहोत. आता 6 एप्रिलपर्यंत हे युद्ध थांबवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. यासोबतच चर्चा होती की, इराणच्या जमिनीवर अमेरिका आपले सैन्य उतरवण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने इराणला एक प्रस्ताव दिला. मात्र, तो इराणकडून नाकारण्यात आला आणि अमेरिकेवर आपला विश्वास नसल्याचेही त्यांनी म्हटले.

अमेरिका-इराण युद्धात दोन्ह देशांमधील शाब्दिक चकमक चांगली वाढल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 एप्रिलपर्यंत इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेदरम्यान, त्यांनी असा दावा केला की हल्ले पुढे ढकलण्यासाठी इराणने स्वतःच वेळ मागितला होता. पण इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा बुरखा फाडण्यात आला.

इराणने थेट जगापुढे डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा आणला आहे. इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांची पोलखोल करण्यात आली. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील एका वृत्तानुसार, शांतता चर्चेत सहभागी असलेल्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, इराणने अमेरिकेकडे कोणताही विलंब मागितला नव्हता. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प स्वत: च्याच मनाने इराणबद्दल विविध दावे करताना दिसत आहेत.

उलट इराणकडून सांगण्यात आले की, दुसऱ्यांदा हल्ला करण्यापासून खुद्द ट्रम्प मागे हटले आहेत आणि आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी ते आमचे नाव पुढे करत आहेत. ते जगाला असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की, हल्ले करण्याची विनवणी इराणकडून केली जात आहे. पण वस्तूस्थिती काही वेगळी असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण अमेरिकेच्या पुढे झुकताना दिसत नाहीये.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?