Strait of Hormuz : आधी इराणवर हल्ला, नंतर ट्रम्प यांचा धडकी भरवणारा दावा; म्हणाले, होर्मुजवर आता…

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज जलमार्गावर अमेरिकेने ताबा मिळवल्याचा धडकी भरवणारा दावा केला आहे. तसेच इराणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे असेही ते म्हणाले. या दाव्यांना इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला करत प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे संघर्ष अधिकच वाढला आहे.

Strait of Hormuz : आधी इराणवर हल्ला, नंतर ट्रम्प यांचा धडकी भरवणारा दावा; म्हणाले, होर्मुजवर आता...
Donald Trump
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 10:19 AM

अमेरिका आणि इराण दरम्यानचा तणाव दूर होण्याची शक्यता दिसत नाहीये. उलट हा तणाव अधिक वाढताना दिसत आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर एक पोस्ट करून इराणला धडकी भरवणारा दावा केला आहे. जलडमरूवर (Strait of Hormuz – होर्मुज जलमार्ग) जवळपास अमेरिकेने जवळपास ताबा मिळवला आहे. निर्बंध आणि हल्ल्यांमुळे इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्याने इराणचे टेन्शन अधिक वाढल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिका तेहरानशी पुन्हा चर्चा करू इच्छितो. त्यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात आहे, असं एबीसी न्यूजने म्हटलं होतं. ट्रम्प यांनी एबीसी न्यूजचा हा दावा फेटाळून लावला आहे. आम्हाला इराणशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची इच्छा नाहीये, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

इराणला चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी आम्ही मजबूर करत नाहीये. एबीसी न्यूजचं वृत्त फेक आहे. जर इराणने काही तडजोड केली तर ती आमच्यासाठी बेकार असेल. आम्हाला या तडजोडीने काही फरक पडणार नाहीये. आम्हाला सद्याची स्थिती अधिक पसंद आहे. आम्ही होर्मुजवर जलडमरूमध्यवर ताबा मिळवला आहे. इराणची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. जे व्हायला हवं होतं, तेच आम्ही करत आहोत. आता इराणची लोकं उठून उभे राहतील आणि लढतील? असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे.

फेब्रुवारीत तणावर सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी अनेक दावे केले आहेत. यापूर्वीही त्यांनी होर्मुजवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. मात्र, तेहरानने वॉशिंग्टनचे हे दावे फेटाळून लावले होते. रणनीतिक जलमार्ग इराणच्या नियंत्रणात असल्याचं इराणने आधीच स्पष्ट केलं होतं.

इराणचा पलटवार

अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. त्याला इराणने जशास तसे उत्तर दिलं आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने केलेल्या दाव्यानुसार, इराणने जॉर्डनच्या अकाबा जवळील एका सैन्य ठिकाण्यावर हल्ला केला आहे. या ठिकाणी अमेरिकेन मरीनची कॅम्पला बॅलेस्टिक मिसाईलने निशाणा साधण्यात आला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात अमेरिकन सैन्य मारले गेले आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us