
आकर्षक, कल्पक आणि भव्यदिव्य असे वैविध्यपूर्ण चित्ररथ देखावे मांड उत्सवात लक्षवेधी असतात. चलचित्रांसोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या कलाविष्काराचे अप्रतिम सादरीकरण करीत कलाकार उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकतात. अफाट गर्दी, नेत्रदीपक तसेच भव्यदिव्य, पौराणिक देखावे पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.
भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न मांडण्यापूर्वीच 3 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची मुले परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखवत शिष्यवृत्तीचे 3 कोटी 26 लाख लाटले. या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोषसिंग राजपूत आणि उज्वल सूर्यवंशी यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. कामगारांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी 60 हजार रुपये शासनाकडून मिळतात. सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. त्यातील बांधकाम कामगार कल्याण विभागाकडे यातील 223 लाभार्थ्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या पाल्यांच्या नावे पैसे उचलल्याची तक्रार दिली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन कामगार आयुक्तांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. मात्र हा प्रश्न मांडण्यापूर्वीच सहाय्यक कामगार आयुक्तांकडून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
राजगृहात शिवसेना नेता आमदार संजय शिरसाट प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला आले आहेत. दादरमधील राजगृह येथे भेटीला आले. आबासाहेब कर्डक यांच्या स्मारक आणि सुशोभीकरणासाठी विशेष आमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरही दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरवर्षी प्रमाणे ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात तुकाराम मैदानात शिवसेनेच्या वतीने शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्रीचे आयोजन केले जात असते …आज देवीच्या मंडपाची भूमिपूजन सोहळा पार पडत आहे..स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूजा अर्चा करत आहे……थोड्याच वेळात भूमिपूजन पार पडणार आहे ..अनेक शिवसैनिक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित आहेत….
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू युद्धाचा मोठा फटका जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योगाला बसला आहे. राज्यातीला सर्वात मोठा चटई उद्योग हा जळगावमध्ये आहे. जळगावातील १५० चटई उद्योगांमधून आकाराला येणाऱ्या चटई देशाच्या विविध भागांसह २५ वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होते. जळगावातून आखाती देशांमध्ये होणारी चटईची निर्यात युद्धामुळे ठप्प झाल्याने 40 ते 50 कोटी रुपयांच्या नुकसानीला चटई उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिका व इराण यांच्यात सुरू युद्धामुळे सात देशांनी चटईची मागणी थांबविली आहे. त्यामुळे उद्योगांचे नियोजन कोलमडल्याचे पाह्यला मिळत आहे.
महाविकासआघाडीची विधानभवनात दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाविकासआघाडीतील सर्व आमदारही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत.
नाशिकच्या ज्योतिषाविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ज्योतिष सचिन देशमुख याच्या विरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी ही नोटीस बजावली असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्याने फसवणूक केली होती. लोकांना भविष्य सांगतांनाच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवले होते. हा फसवणुकीचा आकडा 12 कोटींवर पोहोचला आहे. त्याने तब्बल 50 ते 60 जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ज्योतिषाच्या कार्यालयाला पोलिसांनी सील केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन देशमुख हा फरार झाला आहे.
विलीनीकरण दंतकथा आहे. ही दंतकथा आता संपलीय. काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावाला सहमती मिळाली आहे. संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार महाविकासआघाडीच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार आहेत. शरद पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावाला सहमती दर्शवली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
इराणकडून इस्त्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये बॅलस्टिक क्षेपणास्त्राने हल्ले करण्यात येत आहेत तेल अवीवमध्ये इराणी बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला आहे. इरणी बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम थेट भारताला बसताना दिसत आहे. भारता आयात होणारा एलपीसी गॅस पूर्णपणे बंद झाला
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट ३९ अंशांवर. दादर परिसरात पहाटेपासूनच उन्हाचे चटके; मॉर्निंग वॉकसाठी गर्दी घटली. दुपारी ३८°C ते ४०°C दरम्यान तापमान जाण्याची शक्यता; उकाडा असह्य. मंगळवार-बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांची वाढ. फेब्रुवारीत ३६.३°C असलेला पारा मार्चच्या सुरुवातीलाच उच्चांकावर. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून टोपी, गॉगल्स, पाण्याच्या बाटल्यांचा आधार.
रात्री दूध खरेदी करुन दुध गरम केले तेव्हा दुधाचा रबरा सारखा बनला गोळा. दुध उकळल्यानंतर दुधाचा रबरा सारखा झाला होता गोळा. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांनी खरेदी केले होते दुध. नेहमीच्या दुधवाल्याकडून दुध घेत असतांना पहिल्यांदाच घडला हा धक्कादायक प्रकार. यापूर्वी शिरपूर शहारत देखील भेसळयुक्त दुधाची घडली होती गंभीर घटना
सुर्या टप्पा 01 जुनी सुर्या योजना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नाल्यामध्ये ना दुरुस्त झाली असल्याने, भरती , ओहोटी वेळी काम करावे लागत असल्याने कामास अडथळा निर्माण होत आहे. जुन्या योजने अंतर्गत होणारा 100 द ल ली पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, उध्या 6 मार्च पर्यंत नादुरुस्त पाईपलाईन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे अहवान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी केले आहे.
पाकिस्तान आणि दुबईतून लवकरात लवकर बाहेर पडा, असे थेट आपल्या नागरिकांना अमेरिकेने सांगितले आहे.
शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड. रात्री दूध खरेदी करुन दुध गरम केले तेव्हा दुधाचा रबरा सारखा बनला गोळा. दुध उकळल्यानंतर दुधाचा रबरा सारखा झाला होता गोळा. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांनी खरेदी केले होते दुध. नेहमीच्या दुधवाल्याकडून दुध घेत असतांना पहिल्यांदाच घडला हा धक्कादायक प्रकार.
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट ३९ अंशांवर. दादर परिसरात पहाटेपासूनच उन्हाचे चटके; मॉर्निंग वॉकसाठी गर्दी घटली. दुपारी ३८°C ते ४०°C दरम्यान तापमान जाण्याची शक्यता; उकाडा असह्य. मंगळवार-बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांची वाढ. फेब्रुवारीत ३६.३°C असलेला पारा मार्चच्या सुरुवातीलाच उच्चांकावर.
इस्रायल अमेरिका इराण युद्धामुळे दोन हजार हवाई प्रवाशांना तर चार टन मालाच्या वाहतुकीला फटका. दुबई अबुधाबीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने मालवाहतूक ठप्प झाली आहे. पाच दिवसांमध्ये पुणे विमानतळावरून होणारी चार ते पाच टन मालवाहतूक थांबली आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो मध्ये सर्वाधिक 70 टक्के वाटा ऑटो पार्ट्स आहे तसेच फळे भाजीपाला आणि अन्नपदार्थ हे पुण्यातील शेतकऱ्यांकडे परत पाठवले जात आहेत.
पुण्यातील न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापक एस. एन. कांबळे यांच्यावर झाला आहे. ही बाब समजताच शिव प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला
इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धावर मर्यादा आणण्यासाठी अमेरिकी सिनेटकडून आणलेल्या वॉर पावर्स रेजोल्यूशनला मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादीत करणाऱ्या या विधेयकात सैन्य कारवाई करण्याआधी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी घेणं बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाला 6 दिवस झाले आहेत. यामुळे इस्रायली अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. दर आठवड्याला $2.9 अब्जपेक्षा अधिक नुकसान होत आहे. शाळा बंद आहेत. अर्थ मंत्रालय नुकसान कमी करण्यासाठी प्रतिबंधांमध्ये सवलत देण्यावर विचार करत आहेत.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. अमेरिका-इस्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले सुरु आहेत. काल अमेरिकी नौदालाने टॉरपीडो हल्ला करुन श्रीलंकेजवळच्या समुद्रात इराणी युद्धनौका बुडवली. यात 80 पेक्षा जास्त नौसैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांमध्ये इराणी नौदल आणि एअरफोर्सची ताकद मोठ्या प्रमाणात संपवण्यात आली आहे. दुसरीकडे इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धावर मर्यादा आणण्यासाठी अमेरिकी सिनेटकडून आणलेल्या वॉर पावर्स रेजोल्यूशनला मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादीत करणाऱ्या या विधेयकात सैन्य कारवाई करण्याआधी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी घेणं बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती. पण या विधेयकाला मंजुरी मिळू शकली नाही. आता इराण सोबत कुठलीही चर्चा होणार नाही हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलय.