इराणसोबतच्या युद्धात अमेरिका सर्वात मोठा दणका, अमेरिकेत खळबळ, तब्बल 200 अमेरिकन सैनिक…

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. या युद्धात फक्त तीनच देशांचे नुकसान होत आहे असे नाही. या युद्धाचा थेटपणे सर्वच देशांना मोठा फटका बसताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली. तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिका सर्वात मोठा दणका, अमेरिकेत खळबळ, तब्बल 200 अमेरिकन सैनिक...
US military Iran war
| Updated on: Mar 18, 2026 | 11:08 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. जग या युद्धामुळे संकटात आहे. इराणच्या सर्वाेच्च नेत्याला हल्ल्यात ठार करण्यात आल्यानंतर युद्ध अधिकच भडकले आहे. इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांना शोधून ठार करू असा मोठा इशारा इस्त्रायलकडून देण्यात आला. इस्त्रायलकडून मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. दुसरीकडे इराण देखील इस्त्रायलला सळो की पळो करून सोडत आहे. इस्त्रायल आणि अमेरिका संयुक्तपणे हल्ले इराणवर करत आहे. मात्र, इराण एकटा या दोघांवर भारी पडताना दिसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठा जाम लागला असून मालवाहू जहाज आणि तेलवाहू जहाज अडकून पडली आहेत. परवानगी नसताना होर्मुज खाडीचा वापर करणाऱ्या जहाजाला थेट आग लावली जात आहे. होर्मुज खाडीत स्थिती भयंकर आहे. भारताचे काही जहाज या खाडीतून आली आहेत. मात्र, स्थिती बिकड आहे.

होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न करण्यात आली. मात्र, एकही देशाची याकरिता साथ अमेरिकेला मिळाली नाही. डोनाल्ड ट्रम्प या युद्धात एकटे पडले आहेत. या युद्धात फक्त इराण आणि इस्त्रायलचेच नुकसान होत नाहीये, तर अमेरिकेला ही मोठा फटका बसताना दिसत आहे. नुकताच एक अत्यंत मोठी माहिती पुढे आली.

इराणसोबतच्या युद्धात 200 अमेरिकन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. इराणसोबतच्या युद्धात आमचे 200 सैनिक जखमी झाल्याची माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, यापैकी जास्त करून सैनिक किरकोळ जखमी आहेत. 10 सैनिक गंभीर जखमी आहेत. स्फोटाच्या तुकड्यांमुळे काहीजण भाजले आहेत.

काहींच्या मेंदूला दुखापत झाल्याचीही माहिती आहे. इराणसोबतच्या युद्धात आतापर्यंत 13 अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, या युद्धात अमेरिकेलाही मोठा धक्का बसताना दिसत आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील काही दिवस हे युद्ध सुरू राहणार असल्याचे अगोदरच मोठे संकेत दिले आहेत.

Follow Us