इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा मोठा पराभव, 3 ते 4 दिवसात थेट मोठी घोषणा, इराणच्या तेलावरील..

इराण आणि अमेरिका यांच्यात मोठे युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यानच अमेरिकेतून अत्यंत मोठी घोषणा होण्याचे थेट मोठे संकेत आहेत.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा मोठा पराभव, 3 ते 4 दिवसात थेट मोठी घोषणा, इराणच्या तेलावरील..
Iran America War
| Updated on: Mar 21, 2026 | 10:36 AM

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने तेलाची आयात आणि निर्यात सर्वकाही थांबले. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याकरिता मोठे प्रयत्न अमेरिकेकडून केले जात आहेत. यासोबतच होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिका प्रयत्न करत आहे, पण अमेरिकेला अजिबातच यश मिळत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश जैरीस आले. युद्धामध्ये काहीही संबंध नसताना मोठा फटका जगाला बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान आता होर्मुज खाडीबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी सध्याच्या परिस्थितीवर मोठे विधान केले. समुद्रात अडकून पडलेल्या इराणी तेलावरील निर्बंध हटवण्याचा विचार तीन ते चार दिवसात आशियाला होणाऱ्या पुरवठा पूर्ववत होईल, असे त्यांनी म्हटले.

ख्रिस राईट यांनी म्हटले की, अमेरिका लवकरच समुद्रातील टँकरमध्ये अडकलेल्या इराणच्या तेलावरील निर्बंध उठवू शकते. याचे कारण म्हणजे होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाच्या वाढलेल्या किमती नियंत्रणीत केल्या जाऊ शकतात, यामुळे अमेरिका हे पाऊस उचलून शकते. जर अमेरिकेकडून हा निर्णय घेण्यात आला तर हा मोठा विजय नक्कीच इराणचा म्हणावा लागेल.

फॉक्स बिझनेस नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत बोलताना क्रिस यांनी म्हटले की, वाढलेल्या तेलाचा किमती अमेरिकेच्या या निर्णयामुळे नियंत्रणात येऊ शकतात. ते म्हणाले की, सध्याच्या निर्बंधांमुळे इराणची कच्चे तेल निर्यात करण्याची क्षमता मर्यादित झाली आहे. ज्यामुळे इराणचे तेल बाजारापेठेपर्यंत पोहोचत नाही. जर हे निर्बंध काढले तर इराणचे तेल बाजारपेठांपर्यंत पोहोचेल आणि तेलाच्या उच्च किमती कमी होतील.

अमेरिकेकडून इराणच्या तेलावर काही निर्बंध घातली आहेत. त्यामुळे अमेरिकेचे तेल बाजारापेठेपर्यंत जात नाही. आता ते निर्बंध उठवण्याच्या तयारीत अमेरिका आहे. याबाबत पुढच्या दोन ते तीन दिवसात निर्णय होऊ शकतो. हा इराणचा मोठा विजय म्हणावा लागेल. इराण आणि अमेरिका युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. जगाला पुढील काही दिवस ऊर्जेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

Follow Us