Donald Trump : ट्रम्पकडून लाडकी बहिण योजनेची कॉपी, मिडटर्म निवडणूक जिंकलो तर प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 5 लाख, फक्त अट एकच..

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाडकी बहिण योजनेसारखी ट्रम्प डिविडेंड योजनेची घोषणा केली आहे. अमेरिकेत लवकर मिडटर्मच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे.

Donald Trump : ट्रम्पकडून लाडकी बहिण योजनेची कॉपी, मिडटर्म निवडणूक जिंकलो तर प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 5 लाख, फक्त अट एकच..
Donald trump
| Updated on: Sep 10, 2026 | 12:12 PM

भारतात अलीकडच्या काही वर्षात निवडणुकी दरम्यान एक ट्रेंड आला आहे. जनतेत लोकप्रिय ठरतील अशा आर्थिक योजनांची घोषणा केली जाते. उदहारणार्थ लाडकी बहिण योजना. अशा योजनांद्वारे मतदारांच्या हातात थेट पैसे दिले जातात. त्याचा फायदा मतपेटीतून पदरात पडतो. हे मागच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आलय. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भारताच्या अशा योजनांची कॉपी केल्याचं दिसतय. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात मिडटर्म निवडणुका होणार आहेत. यात विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा डाव टाकला आहे. रिपब्लिकन पार्टीने हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स आणि सीनेट या दोन्ही ठिकाणी विजय मिळवला, तर प्रत्येक वयोवृद्ध अमेरिकन नागरिकाला 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. रिपब्लिकन पार्टीने बुधवारी 9 सप्टेंबर रोजी टेक्सासच्या डलासमध्ये आपल्या पहिल्या मिडटर्म निवडणूक कॅम्पेनची सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी यावेळी अमेरिकन नागरिकांना 5000 डॉलर देण्याचा शब्द दिलाय.

देशाची मजबूत आर्थिक स्थिती आणि आर्थिक यशामुळे ही रक्कम देणार असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी या योजनेला ट्रम्प डिविडेंडचं नाव दिलं आहे. त्यांनी या डिविडंडसह एक अटही ठेवली आहे. हा पैसा अमेरिकेतच खर्च करावा लागेल अशी अट त्यांनी ठेवली आहे. लोकांनी हा पैसा कॅनडा, चीन आणि जर्मनी येथे जाऊन खर्च करु नये. या पैशांसाठी लोकांना कुठल्या अटी-शर्तींचे पालन करावे लागेल ते ट्रम्प यांनी सांगितलं नाही. सरकार हे पैसे कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवेल ते सुद्धा ट्रम्प यांनी स्पष्ट केलं नाही.

या योजनेसाठी अमेरिकेला किती लाख कोटी खर्च येईल?

एका अंदाजानुसार जगभरात जवळपास 24.5 कोटी वयोवृद्ध अमेरिकी नागरिक आहेत. न्यूजवीकनुसार, जर सर्वांना 5000 डॉलर दिले तर या योजनेच्या जवळपास 1.22 ट्रिलियन डॉलर (जवळपास 116 लाख कोटी रुपये) खर्च होतील. ट्रम्प अमेरिकेत राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांबद्दल बोलले आहेत. परदेशात राहणाऱ्या 20 लाख वयोवृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्यातरी या प्रस्तावाबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. डिविडेंडचा पैसा अमेरिकेतच खर्च झाला हे कसं तपासणार त्या बद्दल सुद्धा स्पष्टता नाहीय. वय, उत्पन्न किंवा अजून काही निकष आहेत का? त्या बद्दल अजून काहीच माहिती देण्यात आलेली नाही. नोव्हेंबरमधल्या मिड टर्म निवडणुकीनंतर लगेच युद्ध संपेल असं ट्रम्प म्हणाले. इराणचं नेतृत्व अमेरिकेच्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी आतुर आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us