AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी

donald trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खुली धमकी दिला आहे. इरानने हल्ले केल्याने अमेरिकेने मोठा इशारा दिला.

...तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
| Updated on: Jun 28, 2026 | 3:33 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष भडकला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराण शस्त्रसंधीनंतरही उल्लंघन करत असेल, त्यामुळे अमेरिकी सैन्याला कारवाई करावी लागली, तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन आणि कुवैतवर हल्ले केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर म्हटलं की, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणच्या क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केलं आहे. इराणने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याचाही आरोप ट्रम्प यांनी केला. तर ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, अमेरिका सर्व बाबी संयमाने हाताळत आहेत. इराणने हल्ले करणे थांबवले नाही, तर अमेरिकी सैन्य त्यांचा खात्मा करेल. तसेच इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील’.

https://x.com/TrumpTruthOnX/status/2071009210138263909

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितलं की, इराणच्या विरोधातील कारवाई राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानुसार झाली आहे. आधी इराणने कच्च्या तेलाच्या जहाजावर हल्ला केला. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या या जहाजात २० लाख बॅरल कच्चे तेल होते.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या दाव्यानुसार, अमेरिकेने इराणच्या ड्रोन स्टोरेजसहित विविध ठिकाणी हल्ले केले आहेत. एका दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या मिसाइल, ड्रोन तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील अमेरिकेनेही हल्ले इराणवर हल्ले केले. तेलवाहू जहाजावर हल्ला केल्याने प्रत्युत्तर म्हणून हल्ला केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. इराणने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराचं अमेरिका पालन करत आहे. या करारावरून वाद झाल्यास वाटाघाटी केली जाऊ शकते. परंतु आता इराणने हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे अमेरिकाही त्याचप्रकारे प्रत्युत्तर देईल, असे व्हान्स यांनी सांगितले.  होर्मज सामुद्रधुनीवर हल्ले वाढल्याने लोकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल