जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, या देशाला टाकणार थेट ब्लॅक लिस्टमध्ये, म्हणाले, रशियाकडून..

डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा थेट परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला. रशियासोबत व्यापार करणारे देश आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी दिलीये.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी धमकी, या देशाला टाकणार थेट ब्लॅक लिस्टमध्ये, म्हणाले, रशियाकडून..
US President Donald Trump
| Updated on: Nov 17, 2025 | 12:36 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थोडीसी माघार टॅरिफच्या मुद्द्यामध्ये घेतली असून काही वस्तूंवरील टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकल्याचे बघायला मिळाले. त्यांनी पुन्हा एकदा मोठी धमकी दिलीये. त्यांनी रशियासोबत व्यवसाय करणाऱ्या देशांवर टीका केली आणि आणखी कठोर दंडाची धमकी दिली. यादरम्यान त्यांनी स्पष्टपणे कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. मात्र, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर त्यांचा निशाणा होता. अजून काही दंड आकारण्याबद्दल त्यांनी भाष्य केले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा देखील बंद होते.

सध्याच्या घडीला भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळतंय. इराणला लवकरच ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रिपब्लिकन पक्षाचे कायदेकर्त्यांनी मॉस्कोशी व्यावसायिक संबंध असलेल्या देशांवर निर्बंध लादण्यासाठी कायदा तयार केला आहे. जो अत्यंत महत्वाचा आहे. मी या यादीमध्ये इराणचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रम्प यांनी रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले आहेत. मागील काही दिवसांपासून इराणवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. इराण मोठ्या प्रमाणात अणु कार्यक्रम आणि घातक मिसाईल तयार करत असल्याचे त्यांनी म्हटले इराणला मदत करणाऱ्या कंपन्यांवर त्यांनी थेट कारवाई केली आहे. ज्यामध्ये काही व्यक्तींचा देखील समावेश आहे. फक्त हेच नाही तर रशियन तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांची अमेरिकेतील मालमत्ता देखील ताब्यात घेण्यात आल्या.

अमेरिकन नागरिकांना या कंपन्यांसोबत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचा प्रचंड दबाव असताना देखील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनसोबतच्या युद्धावर ठाम आहेत. पुतिन यांनी स्पष्ट म्हटले होते की, कोणताही स्वाभिमानी देश आणि कोणताही स्वाभिमानी व्यक्ती दबावाखाली कोणताही निर्णय घेत नाही.. हा त्यांनी एकप्रकारे अमेरिकेला टोला लगावला होता. एक प्रकारे त्यांनी अमेरिका मोठा इशारा दिला होता.