जा मग इराणसोबत एकटे लढा.. जगात मोठी खळबळ, युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न, थेट..

इराण आणि इस्त्रायल यांच्या युद्धात अमेरिका मैदानात उतरली. इस्त्रायलची साथ अमेरिकेने दिली. मात्र, आता काही मुद्द्यात या दोन्ही देशातच खटके उडत आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठी धमकी ही इस्त्रायलला दिलीये.

जा मग इराणसोबत एकटे लढा.. जगात मोठी खळबळ, युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न, थेट..
Donald Trump and Benjamin Netanyahu
| Updated on: Jun 09, 2026 | 8:04 AM

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव वाढला आहे. इस्त्रायल लेबनानवर हल्ला करत आहे. इराणच्या इशाऱ्यानंतरही इस्त्रायलचे हल्ले काही थांबत नाहीत. अमेरिकेने इस्त्रायल आणि लेबनानमध्ये युद्धसंधी घडवून आणली. त्यानंतरही इस्त्रायल अमेरिकेचे एक न ऐकता सातत्याने लेबनानवर हल्ले करत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात तणाव वाढला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा इशारा देत नेतन्याहू यांना सांगितले की, जर इस्त्रायलने पुन्हा इराणसोबत युद्ध सुरू केले तर त्यांना एकट्यालाच हे युद्ध लढावे लागेल. अमेरिका या युद्धात त्यांची साथ देणार नाही. एप्रिलमध्ये झालेल्या युद्धसंधीनंतर सोमवारी पहिल्यांदा इराणने इस्त्रायलवर मिसाईल हल्ला केला. लेबनानची राजधानी बेरूतमध्ये इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून ही कारवाई करण्यात आली.

लेबनानवर हल्ला न करण्याचा इशारा यापूर्वी अनेकदा इराणने दिला. मात्र, त्यानंतरही इस्त्रायल लेबनानवरील हल्ले थांबवत नसल्याने अखेर इराणने हल्ला केला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना फोन केला. इराणने केलेल्या हल्ल्याला उत्तर न देण्यास त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, युद्धात एकटेच राहाल हे सांगितल्यानंतर इस्त्रायल थांबले.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्यातरी तणाव वाढू नये, हीच अमेरिकेची इच्छा आहे. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला करत युद्धाला सुरूवात झाली. या युद्धाला तीन महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. मात्र, युद्ध काही थांबत नाही. त्यामध्येच पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसला. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर स्थिती पुन्हा एकदा चांगली झाली.

लेबनानच्या मुद्द्यात इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात मतभेद दिसून येत आहेत. मागील आठवड्यातच दोघांमध्ये वाजले होते. हे ताजे असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इस्त्रायलला सुनावले आहे. युद्धविरामाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. जोपर्यंत अमेरिका इराण जवळील तटबंदी हटवणार नाही, तोपर्यंत होर्मुज खाडी सुरू होणार नसल्याची भूमिका इराणकडून घेण्यात आली.

Follow Us