जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..

इराण आणि अमेरिका युद्धात शस्त्रसंधीची मोठी घोषणा करण्यात आली. युद्धबंदी कराराची बैठक शनिवारी पाकिस्तानमध्ये होत आहे. या बैठकीत सहभागी होण्याकरिता इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या. इराणचा पाकिस्तानच्या मध्यस्थीलाही विरोध असल्याचे कळतंय. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा इशारा दिला.

जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
Donald Trump threat
| Updated on: Apr 10, 2026 | 6:56 AM

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर मोठ्या युद्धाला सुरूवात झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर फार फार तर चार आठवडे युद्ध राहिल, असे सांगितले. त्यांनी इराणला हलक्यात घेतले. पहिल्याच हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा हल्ल्यात जीव गेला. सर्वाेच्च नेताच गेल्यावर इराण युद्धात पराभव पत्कारेल असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. मात्र, डाव सर्व उलटा पडला. सर्वाेच्च नेता ठार झाल्यानंतरही इराण खंबीरपणे उभा आहे. ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. इस्त्रायलच्या महत्वाच्या ठिकाणांवरही त्यांनी हल्ला केला. सर्वात मोठा गेम म्हणजे इराणकडून युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग ऊर्जेच्या संकटात आहे. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेकडून अनेक धमक्या देण्यात आला, पण इराण मागे हटला नाही.

नाना नाना प्रयत्न अमेरिकेने होर्मुज खाडी खुली करण्याकरिता केली. पण त्यांना यश मिळाले नाही. चीन, ब्रिटन, दक्षिण कोरिया या सारख्या देशांची त्यांनी मदतही मागितली. पण अमेरिकेच्या मदतीला एकहीू देश पुढे आला नाही. शेवटी 48 तासाच वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला देण्यात आला, होर्मुज खाडी खुली करण्याकरिता. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली.

यादरम्यानच आता इराणला मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या शस्त्रसंधीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी पुन्हा बंद करण्यात आली. परवानगीशिवाय जहाजांनी येथून जाऊ नये, असे इराणकडून सांगण्यात आले. होर्मुज खाडीतून परवानगीने जहाज सोडणे अयोग्य असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांकडून इराण पैसे घेत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराण जर असे करत असेल तर खूप जास्त चुकीचे आहे. त्यांनी हा प्रकार आताच थांबवावा. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीतून आलेला पैसा इराण युद्धात वापरत आहे.

Follow Us