डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ओकली भारताच्या विरोधात गरळ, थेट म्हणाले, चर्चा नाहीच, जोपर्यंत….

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने वाद सुरू आहे. हेच नाही तर यावर भारताकडून देखील आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलीये. आता यावर परत एकदा ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ओकली भारताच्या विरोधात गरळ, थेट म्हणाले, चर्चा नाहीच, जोपर्यंत....
| Updated on: Aug 08, 2025 | 8:11 AM

अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणले गेल्याचे बघायला मिळतंय. रशियाकडून भारत स्वस्तामध्ये कच्चे तेल विकत घेत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोटदुखी झालीये. याबाबत त्यांनी जाहीरपणे भाष्य देखील केले. आता परत एकदा भारतावर 50 टक्के कर लादण्याबाबत ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले आहे. ट्रम्प यांना एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले की, हा मुद्दा जोपर्यंत सुटणार नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापाराची चर्चा देखील पुढे जाणार नाही.

एएनआयकडून डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की, भारतावर आपण टॅरिफ 50 टक्के कर लावला आहे. या टॅरिफनंतर आपण भारतासोबतची व्यापार चर्चा अधिक वाढवणार आहात का? यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प  म्हणाले की, नाही, जोपर्यंत आम्ही हा मुद्दा निकाली लागणार नाहीत तोपर्यंत नाही. ट्रम्प यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत.

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ 50 टक्के लावण्यात आल्याने भारत सध्या चिंतेत असल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यानच रशियाचे अध्यक्ष भारतात येणार असल्याचीही माहिती मिळतंय. रशियाकडून भारत कच्चे तेल विकत घेत असल्यानेच अमेरिकेकडून भारताच्या विरोधात अशाप्रकारची पाऊले उचलली जात असल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या अगोदरच स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे खूप चांगले मित्र आहेत.

पण भारताकडून आम्ही वस्तू खरेदी करतो, पण भारत आमच्याकडून नाही. भारत आमच्यावर कर लादतो आणि आम्ही नाही. आता भारताच्या समर्थनार्थ काही देश देखील पुढे आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका देखील रशियाकडून काही गोष्टी खरेदी करत असल्याचे भारताने अमेरिकेल दाखवून दिले. मात्र, त्याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला त्याबद्दल माहिती नाही, मी त्याची माहिती घेतो. अमेरिकेच्या निर्णयावर भारत काय निर्णय घेतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.