AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थकतही नाही, झोपतही नाही…भाजपने आपल्या घटनेत बदल करावा, कोणी दिला सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थकतही नाही, झोपतही नाही. देशासाठी संपूर्ण निष्ठेने काम करतात. त्यांना देशसेवा करण्याची आणखी संधी दिली पाहिजे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या घटनेत बदल केला पाहिजे. निवृत्तीचे वय वाढवले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थकतही नाही, झोपतही नाही...भाजपने आपल्या घटनेत बदल करावा, कोणी दिला सल्ला
Narendra ModiImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2025 | 8:43 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात निरंजनी अखाडाचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी जी महाराज यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची आणि नेतृत्वाची गरज आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या घटनेत बदल केला पाहिजे. भाजपने नेत्यांच्या निवृत्तीचे वय 75 वरुन वाढवून 85 वर्ष केले पाहिजे, असे कैलाशानंद गिरी जी महाराज यांनी म्हटले आहे.

महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी जी जमुई जिल्ह्यातील सिमुलतला येथील आश्रमात पोहचले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी जवळून ओळखतो. ते थकतही नाही, झोपतही नाही. देशासाठी संपूर्ण निष्ठेने काम करतात. त्यांना देशसेवा करण्याची आणखी संधी दिली पाहिजे. पीएम नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे.

चीनच्या प्रभावावर चिंता

महामंडलेश्वर यांनी नेपाळमध्ये चीनचा वाढत असलेल्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, भारताने नेपाळच्या संरक्षणासाठी पाऊले उचलली पाहिजे. मी 12 दिवसांचा नेपाळ प्रवास करुन आता परत आलो आहे. त्या ठिकाणी 85 टक्के हिन्दू आहेत. नेपाळ एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे. भारताने नेपाळचे संरक्षण केले पाहिजे. त्या ठिकाणी चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे. नेपाळ आमचा लहान भाऊ आहे. तो आमचापासून वेगळा झाला तर आमचे खूप नुकसान होईल. त्यामुळे नेपाळला चीनच्या प्रभावापासून वाचवले पाहिजे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद केले नाही तर पाकिस्तानवर पुन्हा मोठी कारवाई केली पाहिजे. भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगभरातील देशांचे ऐकून पाकिस्तानवर दया दाखवली. पण तो देश दया करण्याचा लाईकीचा नाही.

कैलाशानंद गिरी यांनी म्हटले, भारत सनातनांचा देश आहे. यामुळे भारताला हिंदू राष्ट्र जाहीर केले पाहिजे. जो भारतात राहतो त्याला ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागणार आहे. भगवा ध्वजास नाही पण राष्ट्रध्वजास तुम्हाला नमन करावेच लागणार आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला ‘वंदे भारत’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणावे लागणार आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.