AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi: पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल, आता म्हटलं काय?

Noida Teen on PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अनेक तरुणांच्या भाषेवरून देशात नाराजीचा सूर आळवला गेला. विशेषता भाजपच्या गोटातून आंदोलकांच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आता नोएडच्या त्या तरुणीचा नवीन व्हिडिओ व्हयारल झाला आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल, आता म्हटलं काय?
मोदींविषयी अपशब्द, तरुणीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Aug 02, 2026 | 1:14 PM
Share

नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर मोठे आंदोलन उभारले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. त्यानंतर तरुणाईचा संताप अनावर झाला. पंतप्रधानांपासून ते अनेक मंत्र्यांविरोधात अभद्र भाषेचा वापर झाला. काहींनी शिव्यांची लाखोली वाहिली. यात अनेक किशोरवयीन असल्याचे समोर आले. या भाषेबद्दल देशातील अनेकांनी चिंता व्यक्त केली. भाजप आणि एनडीएच्या गोटातून तरुणाईच्या तोंडी आलेली भाषेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांना या कृत्याबद्दल माफ केले. त्यानंतर मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

त्या तरुणीचा नवीन व्हिडिओ व्हायरल

देशाच्या पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर करणारी तरुणी चांगलीच ट्रोल झाली होती. या 15 वर्षीय तरुणीचा अजून एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. मी अत्यंत आनंदी आहे. मला पंतप्रधान मोदी यांनी माफ केले आहे. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे ही तरूणी या व्हिडिओत म्हणत आहे. या मुलीने अपशब्दांचा वापर केलेला असतानाही मोदी यांनी तिला माफ केल्याचे म्हटले. तर या मुलीच्या कुटुंबियांनी सुद्धा पंतप्रधानांचे आभार मानले.

मला दुसरे जीवन मिळाले

मला जणू दुसरे जीवन मिळाले. मी इतकी मोठी चूक केली होती. मला अजिबात वाटले नव्हते की ते मला क्षमा करतील. माफ करतील. मला तर वाटले की आता माझे सर्व काही संपले आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी मला माफ केले. त्यांनी मला क्षमा करताच माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझे मन भरून आले. मी रडायला लागले. ज्या व्यक्तीविषयी मी अपशब्द वापरले. इतके वाईट शब्द वापरले. तरीही त्यांनी मला माफ केले. असे वागल्यावरही त्यांनी मला क्षमा केली हेच माझ्यासाठी खूप आहे, असे ही तरुणी व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

संपूर्ण देशाची मागितली माफी

यापूर्वी या मुलीने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी अवघ्या 15 वर्षांची आहे. मला माझी खूप लाज वाटत आहे. मी नजरही वर करू शकत नाही, असे तिने यापूर्वीच्या व्हिडिओत म्हटले होते. नोएडा पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यात तिचे वय 25 वर्षे इतके दाखवले होते. या मुलीला तिने वापरलेल्या भाषेचा पश्चाताप झाला आणि तिने देशाची माफी मागितली. 23 जुलै रोजी जंतरमंतरवर तिने अश्लाघ्य शब्दांचा वापर केला होता.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं