
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारले तेंव्हापासून ते धक्कादायक निर्णय घेत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाबाबतही त्यांच्याकडून अनेक दावे केली जात आहेत. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती आहे. पाकिस्तान तालिबानवर मोठे हल्ले करत आहे. सीमेवरील स्थिती गंभीर आहे. अफगाणिस्तानही आपल्या परीने पाकिस्तानला जोरदार उत्तर देत आहे. अफगाणिस्तानने पाकच्या अनेक चाैक्यांवर ताबा मिळवला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानचे काैतुक केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पाकिस्तानला आपले संरक्षण करण्याचा अधिकार आहे. कालच्या हल्ल्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या 130 लोकांची जीव घेतला. मात्र, तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या 55 लोकांच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, माझे पाकिस्तानसोबत खूप जास्त चांगले संबंध आहेत.
पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की,पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धाबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धात दखल देऊ शकतो पण माझे पाकिस्तानसोबत खूप जास्त चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडे नक्कीच एक चांगले पंतप्रधान आहेत. मी ज्या दोन नेत्यांचा सन्मान आणि आदर करतो, त्यापैकी एक शहबाज शरीफ आहेत.
मुळात म्हणजे पाकिस्तान चांगले करत आहे. पाकिस्तानने जो हल्ला अफगाणिस्तानवर केला तो चांगलाच केल्याचे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. यासोबतच मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी दहशतवादी कारवाईंच्या दूर राहावे. पाकिस्तानचे जाहीरपणे समर्थन अमेरिकेकडून करण्यात आले.
प्रत्येक गोष्टीवर आमचे बारीक लक्ष असल्याचेही अमेरिकेने म्हटले. पाकिस्तान अफगाणिस्तावर मोठी हल्ले करत असतानाच अमेरिकेने समर्थन दर्शवल्याने खळबळ उडाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे एकून भारताला मोठा धक्का बसला. पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत आपले नक्की कसे संबंध आहेत, हे थेटपणे जाहीर केले. यासोबतच त्यांच्या पंतप्रधानांना महान देखील म्हटले आहे.