
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून जगातील सात मोठी युद्ध मी रोखल्याचा दावा करतात. आता त्यांनी अरब आणि मुस्लिम देशांच्या नेत्यांशी चर्चा केलीये. गाजाचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केली जात असल्याचे म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) अरब आणि मुस्लिम नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता गाजामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला आहे. 48 तासांमध्ये हमासने ओलिसांची सुटका करणे आणि युद्ध संपल्यानंतर गाजाच्या पुनर्बांधणींचा देखील या प्रस्तावामध्ये समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अरब आणि मुस्लिम देशाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान गाजामधील युद्ध संपवण्यासाठी तब्बल 21 कलमी प्रस्ताव ठेवला होता. संयुक्त राष्ट्राच्या सभेनंतर त्यांनी म्हटले होते की, गाजाच्या संदर्भात आमची चांगली बैठक झाली. मोठ्या देशांसोबत मिळून झालेल्या या बैठकीमध्ये महत्वाचा गोष्टींवर चर्चा झाली आणि यश मिळाले. आता या बैठकीसंदर्भात पुढची बैठक इस्त्रायलसोबत होईल.
अरब राजनयिकांच्या मते, ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पाकिस्तान, इजिप्त, जॉर्डन, तुर्की, इंडोनेशिया या देशांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सकारात्मक गोष्टींवर चर्चा झाली आणि प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला. आता पुढची बैठक ही इस्त्रायलसोबत असणार आहे. आता इस्त्रायलसोबतच्या बैठकीमध्ये नेमके काय होणार याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.
संयुक्त राष्ट्रांना दिलेल्या औपचारिक भाषणात ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी राज्याला एकतर्फी मान्यता देण्यास विरोध केला होता आणि त्यांनी अशा प्रयत्नांना हमाससाठी फायदेशीर असल्याचे स्पष्ट म्हटले होते आणि युद्धबंदी आणि युद्ध संपवण्याचे आवाहन पुन्हा केले. डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून दावा करतात की, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्येही मी हस्तक्षेप करत हे युद्ध थांबवले होते. मी नरेंद्र मोदी यांना यादरम्यान फोन केला होता. मात्र, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करू युद्ध थांबवल्याचे सांगण्यात आलंय.