कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे भारतच ठरवतो… डोनाल्ड ट्रम्प यांना थेट उत्तर, पहिल्यांदाच..
America Tariff : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने एकच खळबळ उडाली. हेच नाही तर अनेक देशांनी भारतावर लावलेल्या टॅरिफचा विरोध केला. भारतासोबत ब्राझीलवरही टॅरिफ लावण्यात आला. रशिया देखील भारताच्या बाजूने उभा आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावत धक्का दिला. यासोबतच H-1B व्हिसाबद्दलही हैराण करणारा निर्णय घेतला. अमेरिका दबाव टाकत असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवलीये. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी नुकताच भारत आणि रशियाच्या संबंधांवर भाष्य केले. सर्गेई लावरोव यांनी भारत-रशिया संबंधांना एक विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी म्हणून वर्णन केले. हेच नाही तर त्यांनी दोन्ही देशांमधील नाते अनेक वर्षांचे असल्याचेही स्पष्ट केले. भारत रशियाकडून अजूनही तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा थयथयाट सुरू आहे.
अमेरिकेच्या दबावानंतरही भारत आणि रशियाची भागीदारी अडचणीत नसल्याचे स्पष्ट सांगताना सर्गेई लावरोव दिसले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारत हा स्वत: कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचे हे ठरवतो. भारत-अमेरिका व्यापार वाढवण्यासाठी अमेरिका कोणत्याही अटी घालेल, परंतु तिसऱ्या देशांसोबतच्या संबंधांचे निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. भारताची निती तुर्कीसारखी आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव हा भारतावर आहे. अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने जगाला सांगत आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने काय नुकसान होतंय. फक्त भारतच नाही तर चीन देखील मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, भारतावर लावलेल्या निर्बंधांसारखे निर्बंध किंवा टॅरिफ चीनवर अमेरिकेने लावला नाही.
यादरम्यान भारतावर काही गंभीर आरोप करत भारत हा रशियाचे कपडे धुण्याच्या मशिनप्रमाणे काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले. यादरम्यान भारताने अगोदरच स्पष्ट केले होते की, आमच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत तर नका करू. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमध्ये पूर्वीसारखे संबंध कायम आहेत. उलट भारताने टॅरिफनंतरही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलीये. आता पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर डिसेंबर महिन्यात येणार आहेत. या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अमेरिकेचा दाैरा रद्द केला.
