AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि रशियाचा सर्वात मोठा पहिला झटका, मोठी खळबळ, थेट पुतिन..

America Tariff : भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता डोनाल्ड ट्रम्प हे दबाव टाकण्याचे काम करत आहेत. टॅरिफनंतर त्यांनी भारताला अडकवण्यासाठी H-1B व्हिसाचा धक्कादायक निर्णय घेतला. आता पुतिन हे भारतासोबत मिळून डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि रशियाचा सर्वात मोठा पहिला झटका, मोठी खळबळ, थेट पुतिन..
Donald Trump vladimir putin and narendra modi
| Updated on: Sep 28, 2025 | 8:30 AM
Share

संयुक्त राष्ट्र महासभा अमेरिकेत पार पडलीये. मात्र, ही सभा जरी अमेरिकेत असली तरीही भारत आणि रशियाचा यावेळी जलवा बघायला मिळाला. दोन्ही देशांनी एकमेकांचे तोंडभरून काैतुक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहेत. मात्र, तरीही रशिया आणि भारतातील संबंध मजबूत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली असून अमेरिकेच्या दबावाला भीक घातली नाही. आता परत एकदा संयुक्त राष्ट्र महासभेत भारत आणि रशियाची मैत्री बघायला मिळाली. हेच नाही तर सध्याच्या टॅरिफच्या तणावात व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर डिसेंबर महिन्यात येण्यााची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या सत्रात बोलताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, डिसेंबर महिन्यात व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर जाण्याचे नियोजन करत आहेत. पुढे लावरोव यांनी म्हटले की, दोन्ही देशांमध्ये व्यापक द्विपक्षीय अजेंडा आहे. रशिया आणि भारतामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये व्यापार करार आहेत. यासोबतच एससीओ आणि ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही दोन्ही देशांमध्ये समन्वय आहे.

भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनीही भाषणात म्हटले की, भारतामध्येही तुर्कीसारखा आत्मसन्मान आहे. यावेळी त्यांनी म्हटले, भारत हा रशियासोबतच्या व्यापारामध्ये स्वत:चे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट म्हटले की, भारत आणि रशियातील आर्थिक संबंध अजिबात धोक्यात नाहीत, भलेही अमेरिकाने भारतावर रशियाकडून तेल खरेदी करण्यामुळे टॅरिफ लावले असले तरीही.

आता हे स्पष्ट झाले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चीनमध्ये भेट झाली. हेच नाही तर दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकाच गाडीमधून प्रवास देखील केला. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून संवाद साधला होता. अमेरिका भारतावर दबाव टाकत असताना रशिया आणि भारतातील जवळीकता अधिक वाढली आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा