पाकिस्तानची अवस्था कडिपत्त्यासारखी, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दाखवला बाहेरचा रस्ता, मोठा धक्का..

इराण आणि अमेरिका युद्धात कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकत नाहीये. जगाला वेठीस धरले जात आहे. यादरम्यानच आता पाकिस्तानची मोठी फज्जिती उडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मध्यस्थीमधून बाजूला सारत अत्यंत मोठा निर्णय घेतला.

पाकिस्तानची अवस्था कडिपत्त्यासारखी, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दाखवला बाहेरचा रस्ता, मोठा धक्का..
Donald Trump and Pakistan
| Updated on: Apr 30, 2026 | 7:52 AM

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका साकारत आहे. मात्र, पाकिस्तानला अजिबातच यश मिळत नाहीये. त्यामध्येच आता पाकिस्तानला मोठा जोरदार धक्का डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. शेवटी पाकिस्तानच्या हाती काहीच उरले नसल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे सर्व प्रयत्न कोणत्याच कामाचे ठरले नाहीत. इराणने पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. अल जजीराच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला मध्यस्थी ठेवण्याऐवजी आता थेट इराणसोबत फोनवरून संवाद साधत आहेत. ज्यामुळे परिस्थिती पूर्वीपेक्षा आता बदलली आहे. हा पाकिस्तानला मोठा धक्का म्हणावा लागेल. इराणकडून अमेरिकेसोबत थेट बैठकीत बसण्यास नकार देण्यात आला. त्यामध्ये एक पाऊस पुढे टाकत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला.

फोडणीमध्ये कडीपत्त्याला महत्व असते आणि जेवताना कडीपत्त्याला सर्वात अगोदर ताट्याच्या बाजूला काढले जाते, तसे डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाच्या वेळी पाकिस्तानला या मध्यस्थीमधून बाहेर काढले. इराणचे खासदार इब्राहिम रेजाई यांनी म्हटले की, पाकिस्तानवर आता मध्यस्थीसाठी विश्वास राहिला नाही. पाकिस्तान अमेरिकेच्या पुढे काहीच करत नाही.

पाकिस्तान चांगला मित्र आणि शेजारी देश आहे पण इराण पाकिस्तानवर विश्वास ठेऊ शकत नाही. रजाई यांनी थेटपणे आरोप करत म्हटले की, पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने आहे. तो काहीच निर्णय घेऊ शकत नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शब्दाच्या पुढेही जाऊ शकत नाही, यामुळे पाकिस्तानवर आम्हाला विश्वासच नाही. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का नक्कीच म्हणावा लागेल.

इराण आणि अमेरिका युद्धात पहिली बैठक इस्लामाबाद येथेच झाली. मात्र, त्यातून काहीच तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर तर प्रत्यक्षात बैठकही झाली नाही. इराण ऐकण्याच्या मूडमध्येही नाही. इराणचे मंत्री रशियाच्या दाैऱ्यावर गेल्याने अमेरिकेला धक्का बसला. पाकिस्तानच्या मध्यस्थीला यश मिळत नसल्याचे लक्षात येताच आता डोनाल्ड ट्रम्प थेट युद्ध थांबण्याकरिता मैदानात उतरले. त्यांनी पाकिस्तानला बाजूला सारून आपल्या हातात मोर्चा घेतला. डोनाल्ड ट्रम्प थेट इराणसोबत फोनवरून संवाद साधत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us