दुश्मनही करणार नाही असे काम अमेरिकेकडून, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, थेट आदेश..

डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच भरोसा नाही. त्यातच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणविरोधातील संघर्षात मित्राने साथ देण्यास नकार दिल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला.

दुश्मनही करणार नाही असे काम अमेरिकेकडून, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, थेट आदेश..
Donald Trump
| Updated on: Aug 17, 2026 | 7:27 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेचा शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागनला साऊथ कोरियासोबतचे युद्ध अभ्यास कमी करण्याचा आदेश दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये इराणच्या विरोधातील युद्ध कारवाईत सहभागी होण्यास साऊथ कोरियाने नकार दिल्याचे म्हटले. ज्यानंतर त्यांनी मोठे आदेश दिले. युद्ध अभ्यास सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळात ही पोस्ट शेअर केली. सैन्य अभ्यास 17 ते 27 ऑगस्ट चालणार. यात जवळपास 18 हजार साऊथ कोरियाचे सैनिक सहभागी होणार. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ड्रोन हल्ले रोखणे, सायबर हल्ला रोखणे, जीपीए सिग्नल बाधित करणे यासारखा अभ्यास आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांच्यासोबत आपले चांगले संबंध असल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हा अभ्यास फक्त महागडाच नाही तर अशा देशांना चुकीचा आणि आक्रमक संदेश देतो की, त्यांचे अध्यक्ष असल्याने अमेरिकेकडून कोणतीही भीती नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी साऊथ कोरियाचे अमेरिका आणि इस्त्रायल यासोबतच इराण संघर्षाबद्दल भाष्य केले.

त्यांनी म्हटले की, साऊथ कोरियाच्या अध्यक्षाला विचारले की, इराणचे परमाणु शस्त्र हटवण्यासाठी ते अमेरिकेची साथ देणार का? त्यांच्याकडून जे उत्तर आम्हाला मिळाले, त्याहून स्पष्ट झाले की, त्यांना यात काहीच रस नाही. उत्तर कोरियाकडून कायमच अमेरिका आणि साऊथ कोरियाच्या युद्ध अभ्यासावर टीका केली जाते. त्यातच आता इराणसोबतच्या संघर्षात साथ देण्यास साऊथ कोरियाने नकार दिल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला.

त्यानंतर त्यांनी लगेचच सैन्य अभ्यासाबद्दल निर्णय घेतला. उत्तर कोरियाने नुकताच जपानच्या सागरात एक बॅलिस्टिक मिसाईल टाकले. ज्यानंतल खळबळ उडाली. इराणच्या युद्धात साऊथ कोरियाने साथ दिली नसल्याने मोठी खळबळ उडाली. अमेरिकेला वाटले होते की, साऊथ कोरिया इराणविरोधात साऊथ देईल पण प्रत्यक्षात तसे घडले नसल्याने त्यांचा थयथयाट झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us