डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळणार? थेट प्रक्रियेतच..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग वैतागले आहे. या युद्धात जग होरपळले जात आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्काराची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारासाठी आग्रही आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळणार? थेट प्रक्रियेतच..
Donald Trump Nobel Peace Prize
| Updated on: May 01, 2026 | 11:23 AM

इराण आणि अमेरिका युद्धाच्या तणावात पुन्हा एकदा नोबेल पुरस्काराची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार मलाच मिळाला पाहिजे, याकरिता डोनाल्ड ट्रम्प आग्रही होते. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नसल्याने त्यांची मोठी थणथण बघायला मिळाली. मी जगातील मोठे सात युद्ध रोखली असल्याने मीच खरा नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावेदार असल्याचे त्यांनी वारंवार म्हटले. स्वत:च्या तोंडाने अनेकदा ते नोबेल पुरस्कार मागताना दिसले. 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारसाठी 287 लोकांच्या नावाचा विचार केला जाणार आहे. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव असू शकते. मात्र, याबाबत थेट ऑफिशियल काही माहिती मिळू शकली नाहीये. नोबेल समितीचे सचिव क्रिस्टियन बर्ग हारपविकेन यांनी नुकताच बोलताना म्हटले की, या वर्षी 208 व्यक्ती आणि 79 संस्थांचा यामध्ये समावेश आहे.

गेल्या वर्षाच्या यादीमध्ये यावेळी काही नवीन नाव जोडली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायल, पाकिस्तान आणि कंबोडिया या देशांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव पाठवले आहे. 2025 मध्येच डोनाल्ड ट्रम्प सातत्याने नोबेल पुरस्कारासाठी आग्रही होते. मात्र, नोबेल पुरस्कार समितीने स्पष्ट केले होते की, नोबेल पुरस्काराच्या नावाच्य यादीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा कुठेही समावेश नव्हता.

मात्र, यावेळी यादीत काही नवीन नावांचा समावेश झाल्याने नोबेल पुरस्कार समितीकडून सांगण्यात आले. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र, इराणसोबतच्या युद्धात ज्याप्रकारे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने धमक्या देत आहेत. त्यावरून यावेळी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची शक्यता फार जास्त कमी आहे.

इराणमध्ये मोठे हल्ले करण्यात आली. लहान मुलांच्या शाळांना टार्गेट करून हल्ले झाली. गेल्यावर्षी ते युद्ध थांबवल्याचा दावा करत नोबेल पुरस्कार मागत होते. मात्र, यावेळी थेट ते युद्धात उतरल्याचे बघायला मिळाले. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर फार विचार होऊ शकतो, याबाबत शंकाच आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. शिवाय इराणवर पहिला हल्ला अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडूनच करण्यात आला.

Follow Us