इराण अमेरिका युद्ध संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली डेडलाइन, म्हटले, पागल लोकांच्या…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. जग संकटात आहे. यादरम्यान युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध नक्की कधी थांबणार यावर थेट मोठे भाष्य केले आहे.

इराण अमेरिका युद्ध संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली डेडलाइन, म्हटले, पागल लोकांच्या...
US President Donald Trump
| Updated on: Mar 18, 2026 | 9:25 AM

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग संकटात आहे. कोणत्याही परिस्थिती हे युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. युद्ध इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत आहे पण याचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक खुलासा केला. त्यांनी इराणसोबतच्या युद्धाबद्दल मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्याने जगाचे टेन्शन वाढले. 18 दिवसांमध्ये जगातील सर्वच देश संकटात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, हे युद्ध लवकर संपणार नाही. आम्ही आताही तिथून माघार घेऊ शकतो पण मोठे नुकसान झाले पाहिजे आणि पुन्हा एखाद्या देशाच्या नेत्यावर ही वेळ येऊ नये, याकरिता युद्ध सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानामुळे जगात हाहाकार उडाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आजही आम्ही तिथून निघू शकतो आणि तिथे जे नुकसान झाले ते ठीक करण्यासाठी पुढील 10 वर्ष लागतील. पण मला अजून थोडे जास्त वेळ थांबून अधिक नुकसान करायचे आहे. मुळात म्हणजे आम्हाला पुन्हा अशी समस्या हवी नाहीये. खास करून पालग लोकांच्या हातामध्ये परमाणू द्यायचे नाही. आम्ही पागलांच्या हातामध्ये परमाणू शस्त्र देऊ शकत नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, हे युद्ध चांगल्याप्रकारे पुढे जात आहे. अमेरिकेच्या तुलनेत या युद्धात इराण खूप जास्त कमजोर आहे. इराणला कधीच परमाणू हत्यार बनवण्याची परवानगी दिली नाही पाहिजे. युद्ध कधी संपणार यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही सध्याच मागे जाण्याच्या तयारीत नाहीत. हा पण आम्ही लवकरच मागे जाऊ.

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील काही दिवस युद्ध चालणार असल्याचे सांगितले. मात्र, युद्ध नेमके कधी संपणार यावर त्यांनी भाष्य केले नाही. इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. होर्मुज सागरीमार्ग बंद असल्याने तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us