जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेची मोठी घोषणा, अखेर युद्ध थांबणार?, आजच दोन्ही देश..

Iran-US War End : इराण आणि अमेरिका युद्धात युद्धविरामाच्या अनेक हालचाली सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यानच मोठा दावा केला. आज इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार होणार आहे. दोन्ही देश त्यावर स्वाक्षरी करणार आहेत.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेची मोठी घोषणा, अखेर युद्ध थांबणार?, आजच दोन्ही देश..
Donald Trump
| Updated on: Jun 14, 2026 | 7:57 AM

3 महिन्यापेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. या युद्धामुळे जगाची वाट लागली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामध्येच चार ते पाच दिवसांपासून ओमानच्या आखातात स्थिती बिघडत आहे. भारतीय जहाजावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. तीन भारतीय खलाशी ठार झाले. आता पश्चिम आशियात सुरू असलेला अनेक दिवसांचा संघर्ष संपण्याचे संकेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यात रविवारी आज युद्धविराम करार होणार आहे. दोन्ही देश युद्धविराम करारावर सह्या करतील. युद्धविराम करार होताच होर्मुज खाडी खुली होईल. तात्काळ होर्मुज खाडी खुली करण्याबाबत करारात नमुद करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराण आणि अमेरिका युद्धाचा करार होणार असल्याचा दावा केल्याने जगाने अखेर सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, युद्धविराम कराराबाबत अजूनही काही भाष्य इराणने केले नाही. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करून जगाला संकटात टाकल्याचे सांगितले जात आहे.

इराणसोबतचे युद्ध थांबवण्याकरिता मोठा दबाव अमेरिकेवर आहे. इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. अनेक देशात महागाई वाढली आहे. थेट परिणाम होत आहे. भारतासह अन्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर युद्धाचा परिणाम झाला. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

यादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, या करारावर उद्या स्वाक्षरी होणार आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला होईल. आधीच्या प्रशासनांच्या तुलनेत इराणसोबतचे आमचे संबंध आता खूपच चांगले आहेत. आम्ही युरेनियम देखील काढून टाकू. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची थेट घोषणा केल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेने अनेक प्रयत्न करूनही शेवटपर्यंत होर्मुज खाडीवर ताबा मिळवण्यात यश मिळाले नाही.

Follow Us